व्हाट्सअप आता बहुतांशी सगळे जण वापरतात. आपल्याला माहित आहेच कि व्हाट्सअप वर वेगवेगळ्या विषयांशी संबंधित ग्रुप असतात व या ग्रुपचे ॲडमिन यांच्या हातात बऱ्याच प्रकारचे नियंत्रण या ग्रुपचे असते. परंतु ग्रुपवर आलेला एखादा फोटो अथवा व्हिडिओ ग्रुपमधील सर्व मेम्बर्स साठी डिलीट करणे हे ग्रुप एडमिनला शक्य नव्हते.
परंतु आताग्रुप ॲडमीनला व्हाट्सअप ग्रुप वर संपूर्ण नियंत्रण ठेवता येईल असे एक फिचर लवकर येणार असून त्यानुसार आता एडमिनला कोणताही मेसेज,फोटो आणि व्हिडिओ सर्व सदस्यांसाठी डिलीट करता येणार आहे. अगदी सुरुवातीला हे जे काही फीचर येणार आहे ते काही बीटा टेस्टर्ससाठी जारी केले जाणार आहे.
तुम्हाला हे फिचर मिळाले आहे की नाही ते अशा पद्धतीने तपासा
तुम्ही जो काही ग्रुप क्रिएट केला आहे त्यामध्ये हे फिचर काम करत आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्ही तुमचा जो काही ग्रुप आहे त्यामधील कोणताही मेसेज डिलीट करण्याचा प्रयत्न करुन पहा. तुम्ही संबंधित मेसेज डिलीट केल्यानंतर जर 'डिलिट फॉर एव्हरीवन' असा ऑप्शन आला तर समजून घ्या की तुम्हाला हे फिचर मिळाले आहे.
काय आहे या फिचरचे नाव?
मिळालेल्या माहितीनुसार या नव्या फिचरचे नाव 'एडमिन डिलीट' असे असेल. व्हाट्सअप एडमिनला डिलीट फोर एवरी वन चा अधिकार देणारे हे फिचर काही बीटा टेस्टर्सना वापरकर्त्यानाच मिळणार आहे.
यासाठी अशी करा प्रक्रिया
1- अगोदर व्हाट्सअप चॅट मध्ये जाऊन तुम्हाला जो मेसेज डिलीट करायचा आहे त्यावर बोट ठेवा व तो मेसेज सिलेक्ट करा.
जर तुम्हाला एका पेक्षा जास्त मेसेज डिलीट करायचे असतील तर त्यांच्यावरही बोट ठेवून सिलेक्ट करा. त्यानंतर वरील डिलीट आयकॉन वर बोट ठेवा. त्याच्यामध्ये डिलीट फॉर एव्हरीवनचा पर्याय निवडा. ही प्रक्रिया केल्यानंतर संबंधित मेसेज डिलीट होईल.
Share your comments