1. इतर बातम्या

आता ठरलं तर..! देशात याच महिन्यापासून सुरू होणार 5जी सेवा, जिओची 15 ऑगस्टपासून सेवा सुरू होणार

आता जलद इंटरनेटचा अनुभव घेता येणार असून या महिन्यातच देशात 5जी सेवा सुरू होणार असून एअरटेल या दूरसंचार कंपनी याची सुरुवात करणार आहे. या कंपनीने एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंग सोबत त्या संबंधीचा करार केला असून दुसरीकडे जिओ 15 ऑगस्ट रोजी देशभरात 5G नेटवर्क सेवा सुरू करणार आहे. जेव्हा ही सेवा सुरू होईल तेव्हा इंटरनेटचा जो काही वेग आहे तो आता अगोदरपेक्षा दहा पटीने वाढणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
from this month airtel and jio start 5G service in some cities in country

from this month airtel and jio start 5G service in some cities in country

 आता जलद इंटरनेटचा अनुभव घेता येणार असून या महिन्यातच देशात 5जी सेवा सुरू होणार असून एअरटेल या दूरसंचार कंपनी याची सुरुवात करणार आहे. या कंपनीने एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंग सोबत त्या संबंधीचा करार केला असून दुसरीकडे जिओ 15 ऑगस्ट रोजी देशभरात 5G नेटवर्क सेवा सुरू करणार आहे. जेव्हा ही सेवा सुरू होईल तेव्हा इंटरनेटचा जो काही वेग आहे तो आता अगोदरपेक्षा दहा पटीने वाढणार आहे.

याबाबत एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले की, देशातील ग्राहकांना 5जी  इंटरनेटचा लाभ देण्यासाठी एअरटेल जगभरातील सर्वोत्तम टेक्निकल भागीदार सोबत काम करत असून याच महिन्यामध्ये ही सेवा देशातील अनेक ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.

नक्की वाचा:काय म्हणता! आता भारतात टोलवसुली फास्टटॅगने नाही तर होणार सॅटॅलाइटने,याचा काय मिळणार फायदा?

 4जी पेक्षा 5जी किती आहे महाग?

 याबाबत दूरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 5g सेवांचे जे काही दर आहेत ते संबंधित उद्योगांकडून ठरवले जाणार असल्यामुळे त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. याबाबतीत उद्योग तज्ञांच्या मताचा विचार केला तर 5g सेवा ही 4g सेवेच्या तुलनेमध्ये किमान दहा ते 15 टक्के महाग असेल अशी अपेक्षा आहे.

5जी सेवेचे काय होणारे फायदे?

1- आपण यातील फायद्यांचा विचार केला तर जे काही वापरकर्ते आहेत त्यांना जलद गतीने इंटरनेट वापरता येणार आहे.

नक्की वाचा:Transaction: 'गुगल पे' आणि 'फोन पे' वरील नकोसे यूपीआय आयडी 'अशा पद्धतीने' हटवा, नुकसानीपासून करा बचाव

2- तसेच या सेवेमुळे व्हिडिओ गेमिंगच्या क्षेत्रामध्ये फार मोठा बदल घडणार आहे. व्हिडिओ न थांबता सुरू राहतील.

3- जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉल म्हणजेच इंटरनेटचा वापर करून कॉल करत आहे त्यामध्ये आवाजाची स्पष्टता सर्वात उत्कृष्ट असेल.

4- जर तुम्हाला दोन जीबीचा चित्रपट डाऊनलोड करायचा असेल तर तो अवघ्या दहा ते वीस सेकंदात होईल.

5- कृषी क्षेत्रासाठी एक जो काही ड्रोनचा वापर आता होऊ घातला आहे, तो वापर आता शक्य आणि सुलभ होणार आहे.

6- एवढेच नाही तर मेट्रो आणि चालकाशिवाय वाहने चालवणे देखील सोपे होणार आहे.

नक्की वाचा:LIC Policy: महिन्याला 794 रुपये भरा आणि मिळवा 5 लाख 25 हजार रुपये,एलआयसीची 'ही' पॉलिसी आहे फायदेशीर

English Summary: from this month airtel and jio start 5G service in some cities in country Published on: 07 August 2022, 12:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters