1. इतर बातम्या

‘पीएफ’ खात्यातून आता दुप्पट पैसे काढता येणार, फक्त ‘हे’ काम करा!

ठराविक कालावधीसाठी गुंतवलेला पैसा मध्येच काढता येत नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
‘पीएफ’ खात्यातून आता दुप्पट पैसे काढता येणार, फक्त ‘हे’ काम करा!

‘पीएफ’ खात्यातून आता दुप्पट पैसे काढता येणार, फक्त ‘हे’ काम करा!

ठराविक कालावधीसाठी गुंतवलेला पैसा मध्येच काढता येत नाही. तसे केल्यास बऱ्याच अडचणी येतात. प्रसंगी दंडही भरावा लागतो. मात्र, ‘पीएफ’ खातेदारांना (PF Account) या गोष्टींची चिंता करायची गरज नाही. ‘मेडिकल इमर्जन्सी’साठी ‘पीएफ’ खात्यातून दुप्पट रक्कम काढण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलीय.कोरोना काळात अनेक कुटुंबांना आर्थिक चणचण भासली.. दुसरीकडे ‘पीएफ खात्यात पैसे असतानाही ते वापरता येत नव्हते.याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर केंद्र सरकारने पीएफ खात्यातून

दोन वेळा पैसे काढण्याची सूट दिली होती.. त्याआधी पीएफ खात्यातून फक्त एकदाच पैसे काढता येत.कसे काढणार पैसे?पीएफ खात्यातून ‘नॉन रिफंडेबल अ‍ॅडव्हान्स’ स्वरूपात ही रक्कम काढता येते.. त्यासाठी पुढील स्टेप्स फाॅलो करा.सर्वप्रथम https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटवर जा.पला यूएएन नंबर, पासवर्ड, कॅप्चा कोड भरुन ‘लॉग-इन’ करा.उपलब्ध पर्यायांमधून तुमच्या क्लेमसाठी योग्य फॉर्म निवडा. त्यात फॉर्म 31, 19, 10 C आणि 10 D असे पर्याय असतील.

नंतर तुम्ही दुसऱ्या वेब पेजवर जाल. तिथे सर्व माहिती भरा. नंतर बँक खात्याची माहिती भरून व्हेरिफाय करा.तुमचं सर्टिफिकेट व अंडरटेकिंगची मागणी केली जाईल. पुढे ड्रॉपडाउन मेनूमधून पीएफ अ‍ॅडव्हान्स फॉर्म 31ची निवड करा. आणखी एका ड्रॉपडाउन मेनूमधून कोरोना महामारीमुळे पैसे काढण्याचा पर्याय निवडा.तुम्हाला हवी असलेली रक्कम टाइप करा, तपासलेली कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता टाइप करा.नंतर तुमच्या आधार कार्डशी रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबरवर ‘ओटीपी’ येईल. ओटीपी एंटर केल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.

तुमचा अर्ज दाखल होईल. नंतर ‘ईपीएफओ’ तुमची माहिती तपासून अर्ज मंजूर करेल. नंतर तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल.किती पैसे काढता येतात?पीएफ खात्यातून 3 महिन्यांची बेसिक सॅलरी किंवा खात्यातल्या एकूण रकमेच्या 75 टक्के भाग, यांपैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे पैसे तुम्हाला काढता येतात. पैसे काढण्याची प्रक्रिया ‘ऑनलाइन’ करता येते.. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.

English Summary: Now double money can be withdrawn from 'PF' account, just do 'this'! Published on: 15 July 2022, 02:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters