केंद्र सरकारने यापूर्वी पॅनकार्डसोबत आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. आता आधार लिंक बाबत अजून एक महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. मतदारकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय असल्यास म्हटलं जात आहे. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. पॅनकार्डसोबत आधार लिंक करणे गरजेचे होते.
मात्र आता आधार कार्ड मतदार ओळखपत्राशीही लिंक करणे गरजेचे झाले आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता एका व्यक्तीकडे फक्त एकचं मतदार ओळखपत्र असेल. सरकारच्या निर्णयामुळे आता, ज्यांनी एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे ठेवली आहेत म्हणजेच ज्यांच्याकडे बनावट ओळखपत्र आहेत ती दूर होण्यास मदत होईल. असा विश्वास आहे. या निर्णयाची अधिसूचनाही केंद्र सरकारने जारी केली आहे. वृत्तानुसार, कायदा मंत्र्यांनी एक तक्ता शेअर केला आहे ज्यात त्यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे.
यादीचा डेटा आधार इकोसिस्टमशी जोडल्यास, एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रांचा वापर करू शकत नाही. मोदी सरकारने निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे कायदामंत्र्यांनी सांगितले. बोगस किंवा बनावट मतदार ओळखपत्रांचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आधारकार्डशी मतदार ओळखपत्राशी लिंक केल्यास बनावट ओळखपत्रांचा पर्दाफाश होईल. यातून अनेक मतदार ओळखपत्रांवर बंदी घालण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले...
पॅन आधार लिंक -
यापूर्वीच केंद्र सरकारने पॅन आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अजूनही अंमलबजावणी केली नसेल तर लगेच करा कारण अधिक उशीर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तुम्हाला 30 जूनपासून दुप्पट दंड भरावा लागणार आहे. आणि 1 जुलैपासून 1,000 रुपये दंड भरावा लागेल.
महत्वाच्या बातम्या:
किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध
महाराष्ट्रातून खताची तस्करी करणा-यांचा पर्दाफाश; ट्रक चालक अटकेत
Share your comments