आता मोबाईल निर्मिती क्षेत्रातील नोकिया ही कंपनी सगळ्यांच्या परिचयाचे आहे. भारताला मोबाईल फोनची ओळखच मुळात नोकिया कंपनीने करून दिली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर आपण या महिन्याच्या सुरुवातीला विचार केला तर एचएमडी ग्लोबल या कंपनीने नोकिया 8120 4G फिचर फोन भारतामध्ये लॉन्च केला होता.
कंपनीच्या नवीन ऑफर मध्ये दोन डिस्प्ले सोबत आयकॉनिक फ्लीप डिझाईन असे निरनिराळे वैशिष्ट्य आहे हे नक्कीच नॉस्टॅल्जिया पुन्हा आणत आहे.या फोनची किंमत खूप कमी असून वैशिष्टे मात्र खूप छान आहेत.
नोकिया 2660 फ्लिप 4G फोनची किंमत
हा फोन रेड, न्यू आणि ब्लॅक या तीन कलर मध्ये सादर करण्यात आला असून यामध्ये पर्यायी नोकिया चार्जिंग क्रॅडलसह देखील येत आहे. या फोनची किंमत 4699 रुपये असून तुम्हाला जर तो खरेदी करायचा असेल तर नोकिया इंडिया ऑनलाईन स्टोअर आणि ऑफलाईन रिटेल आउटलेट वरुन खरेदी करता येईल.
या फोनची वैशिष्ट्ये
नोकियाचा हा फोन 320×340 पिक्सेल रिझोल्युशनसह 2.8 इंचच्या मुख्य डिस्प्लेसह येतो.160×128 पिक्सेल रिझोल्युशनसह 1.7 इंच मोजते. यामध्ये युजर्ससाठी एक इमर्जन्सी बटन देण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्याच्या पाच नातेवाईकांना त्वरित संपर्क साधण्याची यामधून सोय आहे.0.3MP VGA रियर कॅमेरा आहे.
या फोनची बॅटरी ही 1450mAh जी काढता आणि टाकता येण्याजोगी आहे. यात 48 एमबी रॅम 128 अंतर्गत स्टोरेज आहे. हे इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून 32 जीबीपर्यंत वाढवता येते. त्या फोनमधे कनेक्टिव्हिटी साठी ड्युअल सिम,4G VoLTE,ब्लूटुथ, हेडफोन जॅक, वायरलेस एफ एम रेडिओ आणि mp3 प्लेयर लिस्ट आहे. यामध्ये हीअरिंग कॉलिटी म्हणजे ऐकू येण्याची क्षमता खूपच छान आहे.
Share your comments