Petrol Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांकडून (Indian Oil Companies) सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सलग ८० दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. घरगुती गॅसच्याही किमती वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली. सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.
येत्या रब्बी हंगामात या पिकांची लागवड बनवणार मालामाल! जाणून घ्या...
तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. महाराष्ट्रातील सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे थोडे का होईना पेट्रोल दर कमी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
कमी गुंतवणुकीत व्हाल मालामाल! दुग्धव्यवसाय सुरु करून दरमहा करा लाखोंची कमाई
मुख्य शहरातील आजचे दर
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.७२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल १०३.१९ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर.
यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
महत्वाच्या बातम्या:
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोने मिळतंय 4000 रुपयांनी स्वस्त...
IMD Alert : पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये धो धो कोसळणार; हवामान खात्याचा इशारा
Share your comments