1. इतर बातम्या

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन, जाणून घ्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त

२२ ऑक्टोबर ला धनत्रयोदशी आहे, धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन, जाणून घ्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन, जाणून घ्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त

२२ ऑक्टोबर ला धनत्रयोदशी आहे, धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत, आपल्या धनाची पूजा करून,या दिवशी निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो.दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन, जाणून घ्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त

नरकचतुर्दशी दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे.Abhyangasnana during Narak Chaturdashi Diwali festival is given special importance in Indian culture. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे.

एक सत्य घटना कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल, स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपति जाॅन डी राॅकफेलर

नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. 'तेल, उटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे. तेव्हाच आत्म्यावरील अहंमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. अभ्यंगस्नान झाल्यावर देव व आई - वडिलांचे

दर्शन घ्यावे. या दिवशी यमतर्पण केल्याने अपमृत्यू टाळता येतो असे सांगितले जाते. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरिता पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.अभ्यंगस्नान मुहूर्त गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी अभ्यंगस्नान, लक्ष्मी कुबेर पूजन,अलक्ष्मीनिस्सारण,महावीर निर्वाण आहे. या दिवशी चंद्रोदयाच्यावेळी पहाटे ५.४९ वाजता अश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरकचतुर्दशी आहे. चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे ५.४९

वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी ६.४१ वाजेपर्यंत अभ्यंगस्नान करावयाचे आहे.दिवाळी : दीपोत्सवाच्या काही ऐतिहासिक गोष्टी आणि मान्यता लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन करताना पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. लक्ष्मी रूपाने

तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी धार्मिक कृती करतात अश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते. शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

English Summary: Narak Chaturdashi and Lakshmi Kuber Pooja, Know the timing of Abhyanga Snan Published on: 22 October 2022, 06:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters