स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रामध्ये जगात वेगवेगळ्या कंपन्या आघाडीवर आहेत. आपल्याला माहित आहे की, अगदी सात ते आठ हजार पासून ते लाखो रुपयांपर्यंत किमतीचे फोन बाजारपेठेत आहेत. परंतु आपल्या बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन मिळाला तर हि इच्छा खूप जणांची असते.
बरेच स्मार्टफोन अगदी बजेट किमतीमध्ये मिळतात. परंतु बऱ्याचदा काही बाबतीत त्यांच्यात काहीतरी कमी असते. त्यामुळे हिरमोड होतो. या लेखात आपण अशाच एका उत्तम मध्यम बजेट असणाऱ्यांसाठी उपयुक्त अशा स्मार्टफोनबद्दल माहिती घेऊ.
'Moto G52' आहे उपयुक्त स्मार्टफोन
मोटोरोलाने भारतात आपला नवीन जी सिरीज असलेला स्मार्टफोन 'मोटो जी52' लॉन्च केला. मोटो जी श्रेणीतील हा सर्वात स्लिम आणि सर्वात हलका म्हणजेच 169 ग्रॅम वजनचा हँडसेट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा तसेच 5000mAh क्षमतेची बॅटरी तसेच ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
या स्मार्टफोनची किंमत
या फोनमध्ये दोन प्रकार असून एक म्हणजे चार जीबी प्लस 128 जीबी आणि दुसरा म्हणजे सहा जीबी प्लस 128 जीबी हे होय.
यामध्ये चार जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 14 हजार 499 रुपये आहे आणि 6 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 16 हजार 499 रुपये आहे.
या फोनची वैशिष्ट्ये
1- हा फोन 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशन सह 6.6 तुमचा फुल एचडी+AMOLED डिस्प्ले सह येतो.
2-कंपनीने या स्मार्टफोनला 6 जीबी पर्यंत रॅम 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे.
3- या फोनमध्ये Adreno 610 GPU सह स्नॅपड्रॅगन 680 चिप सेट प्रोसेसर देण्यात आला आहे.
4- उत्तम फोटोग्राफी कॉलिटी साठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेट दिला असून यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन मेगापिक्सल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तसंच सेल्फी साठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
5- या फोन मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ती 30W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.
6-साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर ने सुसज्ज,ब्लूटुथ 5.0, NFC, वाय-फाय आणि जीपीएस सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आले आहेत.
Share your comments