1. इतर बातम्या

Mobile World: नवीकोरी कंपनीचा नवाकोरा 'नथिंग फोन' चे बाजारात पदार्पण,वाचा त्याची वैशिष्ट्ये

आपल्याला माहित आहे कि स्मार्टफोन निर्मितीमध्ये अनेक मातब्बर कंपन्या जगात आहेत. या कंपन्या दरवर्षी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि अनेक विविधांगी वैशिष्ट्यांनी युक्त स्मार्टफोन बाजारात आणत असतात. परंतु या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या भाऊगर्दीत नवीनच कंपनीने उडी घेतली असून या नवीन कंपनीने एक नवा कोरा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nothing phone

nothing phone

आपल्याला माहित आहे कि स्मार्टफोन निर्मितीमध्ये अनेक मातब्बर कंपन्या जगात आहेत. या कंपन्या दरवर्षी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि अनेक विविधांगी वैशिष्ट्यांनी युक्त स्मार्टफोन बाजारात आणत असतात. परंतु या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या भाऊगर्दीत नवीनच कंपनीने उडी घेतली असून या नवीन कंपनीने एक नवा कोरा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

लंडन येथील टेक स्टार्टअप असलेल्या 'नथिंग' या कंपनीने मंगळवारी या फोनचे लॉन्चिंग केले. हा फोन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे कारण त्याची इको फ्रेंडली असलेल्या पॅकेजिंग ही होय.

 नथिंग कंपनीची पार्श्वभूमी

वनप्लस ही कंपनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या कंपनीचा सहसंस्थापक कार्ल पाय यांनी वन प्लस सोडली आणि 2020 मध्ये लंडन येथे नथिंग टेक स्टार्टअप कंपनीची स्थापना केली.

स्मार्टफोन निर्मितीच्या क्षेत्रात आणि तंत्रज्ञानामध्ये काहीतरी वेगळे करण्याची कार्ल पाय याची धडपड पाहून अनेक गुंतवणूकदारांनी नथिंग मध्ये  गुंतवणूक केली आणि दोन वर्षाच्या कालावधीत या कंपनीने त्यांचा पहिला स्मार्टफोन बाजारात आणला.

नक्की वाचा:TVS Scooter: टीवीएस स्कूटी पेप प्लस स्कूटर आहे खुप खास, किंमत देखील आहे खुपच कमी, वाचा सविस्तर

'नथिंग' फोनचे  वैशिष्ट्य

1- नथिंग इकोसिस्टम- या वैशिष्ट्यामुळे थर्ड पार्टी प्रॉडक्ट स्मार्टली ॲक्सेस करता येणार आहे. अगदी सुरुवातीला टेस्लासोबत भागीदारी करत कारचे दरवाजे, एसी, म्युझिक सुरू किंवा बंद करता येईल. यासाठी कुठलाही नवीन ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.

2-ग्लीम्फ लाईट इंटरफेस- या फोनच्या मागील बाजूला दिलेल्या ग्लीम्फ इंटरफेस मध्ये नऊशे एलईडी लाईट चा वापर करण्यात आला आहे. कॉल, एस एम एस, ई-मेल नोटिफिकेशन आल्यास आकर्षक पद्धतीने सुरू असतात.

3-ग्लीम्फ मोड- या फोनच्या कॅमेरा ॲप मध्ये स्टुडिओ लाईट तसेच ग्लीम्फ लाईट मॉडल देण्यात आले असून त्याचा वापर उत्तम प्रकारच्या फोटोग्राफीसाठी चांगल्या प्रकारे करता येतो.

नक्की वाचा:Honda Activa: खरं काय! या ठिकाणी फक्त 10 हजारात मिळतेय होंडा ऍक्टिवा; वाचा संपूर्ण डिटेल्स

4- वायरलेस/ रिव्हर्स चार्जिंग- या स्मार्टफोनमध्ये 15W Qi वायरलेस चार्जिंग सोबतच 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला असून या वैशिष्ट्यामुळे या स्मार्टफोनवर नथिंग चा दुसरा स्मार्टफोन किंवा नथिंग इयरबड्स ची केस ठेवल्यास तीदेखील चार्ज करता येते.

5- अँड्रॉइड सपोर्ट- नथिंग कडून या स्मार्टफोन साठी तीन वर्ष अँड्रॉइड सपोर्ट आणि चार वर्षासाठी दर दोन महिन्यांनी सिक्युरिटी अपडेट देण्यात येणार आहे.

6- रॅम- 8 जीबी, बारा जीबी

7- स्टोरेज - 128 जीबी, 256 जीबी

8- रियर कॅमेरा- 50 मेगापिक्सल

9- फ्रंट कॅमेरा- 16 मेगापिक्सल

10- बॅटरी क्षमता-4500mAh

11- रंग- ब्लॅक अँड व्हाईट

12- किंमत- आठ जीबी + 128 जीबी - बत्तीस हजार 999 रुपये

13- आठ जीबी + 256 जीबी - 35 हजार 999 रुपये आहे.

नक्की वाचा:BMW Mercedes या ठिकाणी मिळतायेत अतिशय कमी किंमतीत, किंमत ऐकून तुम्हीही….

English Summary: new smartphone company launch nothing phone with verious fetures Published on: 15 July 2022, 10:55 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters