1. सरकारी योजना

मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...

कोरोना काळात देशावर अनेक मोठी संकटे आली. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांचे व्यवसाय देखील बंद पडले. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आता देशातील बेरोजगारीचा दर आणखी वाढला आहे. आता बरेच लोक आपले उत्पन्न सुरू करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Modi government announces Rs 10 lakh

Modi government announces Rs 10 lakh

कोरोना काळात देशावर अनेक मोठी संकटे आली. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांचे व्यवसाय देखील बंद पडले. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आता देशातील बेरोजगारीचा दर आणखी वाढला आहे. आता बरेच लोक आपले उत्पन्न सुरू करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहेत.

असे असताना आता तुम्हालाही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही पंतप्रधान योजनेंतर्गत हमीशिवाय कर्ज घेऊ शकता. सरकारच्या या योजनेचा उद्देश एवढाच आहे की त्यातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळू शकेल. यामुळे या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये, कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे हे फायदेशीर आहे.

या पंतप्रधान योजनेंतर्गत तीन प्रकारची कर्जे दिली जाणार आहेत. यामध्ये शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्जाचा समावेश आहे. यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ शकता. यामुळे अनेकांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतील आणि पैशांची अडचण असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊन आपले काम सुरू करू शकता.  सरकारच्या या योजनेंतर्गत 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज provide loans दिले जाणार आहे.

आता ड्रोनच्या सहाय्याने होणार सामानाची डिलेव्हरी, देशातील पहिला प्रयोग यशस्वी

यासाठी तुम्हाला मुद्रा कार्ड लागेल. या मुद्रा कार्डद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी याचा वापर करू शकता. यामध्ये शिशू कर्जासाठी 50 हजार रुपये उपलब्ध आहेत. दुसऱ्या किशोर कर्जामध्ये तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपये मिळतात. यानंतर तरुण कर्जामध्ये तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पैसे मिळवू शकता.

कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन, बाजारात सध्या सर्वाधिक मिळतोय दर

यासाठी तुम्ही पीएम मुद्राच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, कायम पत्ता, व्यवसायाचा संपूर्ण पत्ता पुरावा इत्यादी असणे अत्यंत provide loans आवश्यक आहे. ही कागदपत्रे नसतील तर ती तुम्हाला काढावी लागतील. यासोबतच तीन वर्षांच्या ताळेबंदाची प्रत, आयकर विवरणपत्र आणि स्व-कर विवरणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही काही दिवसात पैसे मिळवू शकता.

महत्वाच्या बातम्या;
'बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो'
बजाजने सर्वात स्वस्त बाइक केली बंद, सर्वांना परवडणारी गाडी बंद झाल्याने अनेकांची नाराजी
आता तुमची गाडी कधीच पंम्चर होणार नाही, जाणून घ्या सविस्तर

English Summary: Modi government announces Rs 10 lakh! loan 10 lakhs guarantee, apply Published on: 02 June 2022, 12:32 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters