बर्याच जणांच्या डोक्यामध्ये कुठला तरी व्यवसाय किंवा उद्योग धंदा स्थापन करण्याचे चालू असते. परंतु नेमका कोणता चालू करावा किंवा कोणता उद्योग स्थापन करावा याबाबतीत बरेच जण द्विधा मनस्थितीत असतात.
उद्योग सुरू करण्याआधी डोक्यामध्ये दोन विचार कायम असतात एक म्हणजे लागणारी गुंतवणूक आणि उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारपेठेत किती मागणी आहे? हे दोन विचार कायम डोक्यात असतातच.
त्यातल्या त्यात कमीत कमी गुंतवणुकीमध्ये कोणता व्यवसाय स्थापन करता येईल हे देखील खूप महत्त्वाचे असते. गुंतवणूकही कमी आणि मिळणारा नफा ही जास्त असा एखादा व्यवसाय स्थापन केला तर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती होऊ शकते.
या लेखामध्ये आपण असाच एका हटके मात्र बाजारपेठेत खूप मागणी असलेल्या व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:ऑइल मिल व्यवसाय: अशाप्रकारे तेल व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ नफा
पेपर नॅपकिन्स( टिशू पेपर) निर्मिती व्यवसाय
आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये टिशू पेपरचा वापर फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आपल्याला माहित आहेच की, हॉटेल, रेस्टॉरंट, एखाद्या ऑफिस असो कि हॉस्पिटल अशा बऱ्याच ठिकाणी जवळपास हाताच्या आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी टिश्यू पेपरचा वापर सर्रासपणे केला जातो.
त्यामुळे या व्यवसायाला भविष्य खूप तेजस्वी आहे. जर तुम्हाला पेपर नॅपकिनचे उत्पादन युनिट स्थापन करायचे असेल तर तुम्हाला जवळपास साडेतीन लाखाच्या आसपास रकमेची तजवीज करावी लागेल आणि बाकीचे रक्कम तुम्ही मुद्रा योजनेच्या माध्यमातून कोणत्याही बँकेत अर्ज करून उभारू शकतात.
तुमच्याकडे जर साडेतीन लाख रुपये असतील आणि बँकेकडून तुम्हाला तीन लाख दहा हजार रुपये मुदत कर्ज आणि पाच लाख 30 हजार रुपये पर्यंतचे खेळते भांडवल यासाठी कर्ज मिळू शकते. एका वर्षांमध्ये दीड लाख किलोपर्यंत पेपर नॅपकिनचे उत्पादन होणे शक्य आहे.
याचा एकूण दराचा विचार केला तर 65 रुपये प्रति किलो दर आहे. या हिशोबाने जर तुमची वार्षिक उलाढालीचा विचार केला तर जवळ जवळजवळ 97 लाखापर्यंत जाते. याचा तुमचा खर्च वजा केला तर वर्षाला दहा ते बारा लाख रुपयांची बचत म्हणजेच निव्वळ नफा मिळवता येणे शक्य आहे.
पंतप्रधान मुद्रा योजनेचा मिळेल आधार
भांडवल उभारणीसाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आधार घेऊ शकता. याकरिता तुम्ही बँकेत अर्ज करून लोन मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो ज्यामध्ये सगळा तपशील नमूद करावा लागतो.
नाव, पत्ता, व्यवसाय पत्ता तसेच शिक्षण तुमचे चालूचे उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे या संबंधीचे सगळी माहिती तुम्हाला नमूद करावे लागते. सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही कर्जाची रक्कम परत करू शकतात.
Share your comments