1. कृषी व्यवसाय

शेतीही करा,उद्योजकही व्हा! करा गुंतवणूक दोन लाख रुपयांची अन सुरु करा 'टोमॅटो सॉस'युनिट, वाचा माहिती

शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेतात. बऱ्याचदा ज्या शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन येते त्यावेळेस नेमकाच बाजार भाव पडलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने त्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tomato saus business

tomato saus business

 शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेतात. बऱ्याचदा ज्या शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन येते त्यावेळेस नेमकाच बाजार भाव  पडलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने त्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागतो.

यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. दरवर्षी आपण टोमॅटोच्या  बाबतीत बर्‍याच प्रकारच्या बातम्या वाचतो. टोमॅटोचे दर घसरल्यामुळे बरेच शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देणे पसंत करतात.

  कारण शेतकऱ्यांचा बाजारपेठेपर्यंत आणण्याचा वाहतूक खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हे पाऊल उचलतात. परंतु  शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर शेतकऱ्यांनी सुरू केले तर नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.

प्रक्रिया उद्योग स्थापन यासाठी शासनाकडून देखील विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. या लेखामध्ये आपण टोमॅटो सॉस युनिट कसा सुरू करावा याबद्दल माहिती घेणार आहोत.

 टोमॅटो सॉस युनिट(Tomato Saus Unit)

 केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत अनुदान स्वरूपात केली जाते. यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना ही देखील लाभदायक योजना आहे.

टोमॅटो सॉस युनिटच्या बाबतीत मुद्रा स्कीम चा प्रोजेक्ट रिपोर्ट चा विचार केला तर, 2 लाख रुपये तर तुमच्याकडे भांडवल असेल तर तुम्ही टोमॅटो स्वास चे युनिट आरामात सुरू करून चांगली कमाई करू शकता. आपल्याला माहित आहेच कि फास्ट फूडचा जमाना सध्या सुरू आहे.

अशा परिस्थितीत टोमॅटो सॉस च्या बाटल्या आणि वेगवेगळ्या आकारातले पाऊच यांची मागणी खूप वाढत आहे. मुद्रा योजना अंतर्गत सरकार तुम्हाला तुमच्या या प्रकल्पाला मदत करू शकते.

नक्की वाचा:बिझनेस आयडिया 2022: घरी बसून कांद्यापासून बनवा 'हा' पदार्थ आणि लाखो रुपये कमवा, वाचा संपूर्ण माहिती

 एवढी असेल प्रकल्पाची किंमत(Project Cost)

 प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रोजेक्ट प्रोफाइल चा विचार केला तर तुम्ही जर टोमॅटो मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करत असाल तर तुमच्या कडे जवळजवळ एक लाख 95 हजार रुपये असणे गरजेचे असून

यासाठी तुम्ही 150000 टर्म लोन आणि जवळ जवळ चार लाख 36 हजार वर्किंग कॅपिटल लोन घेऊ शकतात. या दोन्ही लोनचा विचार केला तर तुमची प्रोजेक्ट कॉस्ट जवळ जवळ सात लाख 82 हजार रुपये होते.

 टोमॅटो सॉस बनवण्याची पद्धत

 टोमॅटो सॉस बनवण्यासाठी सगळ्यात आधी पिकलेले आणि धुतलेले टोमॅटो स्कीम कॅटल मध्ये उकडतात. उकडलेले टोमॅटो शिजवले जातात आणि बिया फायबर आणि ठोस कचऱ्यापासून रस वेगळा काढला जातो.

या रसात अद्रक, लसूण, लवंग, काळी मिरी, साखर, मीठ, सिरका इत्यादी मसाल्याचे पदार्थ केले जातात. योग्य मात्रेत प्रीझर्व पल्पमध्ये मिसळला जातो आणि त्यानंतर थंड केला जातो.

ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सॉस पाउच किंवा बॉटल्स मध्ये पॅकिंग केला जातो व सीलबंद करून माल विक्रीसाठी पाठविला जातो.

नक्की वाचा:Processing:आरोग्याचा खजिना आणि उत्कृष्ट चवीचे आगार असलेला सेंद्रिय गुळ बनवा आणि कमवा मोठा नफा

 वर्षात किती कमाई करू शकता?(How Much Earn?)

 मुद्रा स्क्रीम प्रकल्प अहवालानुसार, तुम्ही एका वर्षात 30 हजार किलो टोमॅटो सॉस तयार करू शकता. यात 30 हजार किलो टोमॅटो सॉस ची उत्पादन किंमत पाहिले तर 24 लाख 37 हजार रुपये येते.

जर तुम्ही उत्पादित केलेला 30 हजार किलो सॉस 95 रुपये प्रति किलोचा रेटने बाजारपेठेत विकला तर तुमचा वार्षिक टर्नवर 28 लाख 50 हजार रुपये होतो. म्हणजेच तुम्हाला चार लाख 12 हजार रुपयांचा इन्कम मिळतो.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो मिश्र मत्स्यव्यवसायामुळे उत्पन्नाचे दरवाजे उघडतील, होईल मोठा नफा

English Summary: tomato saus business give more profit in 2 lakh investment Published on: 13 July 2022, 08:11 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters