कमी गुंतवणूक जास्त नफा हे सूत्र कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकाच्या डोक्यात असते. व्यवसाय स्थापन करताना तो मोठ्या प्रमाणात सुरु करावा असे काही नसते. असे बऱ्याच प्रकारचे व्यवसाय आहेत,जे सुरू करण्यासाठी गुंतवणूक खूप कमी लागते. परंतु ते बर्याचदा डोक्यात येत नाही. आपण बऱ्याच लेखांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या आयडिया मांडत असतो.
जेणेकरून वेगळ्या प्रकारच्या व्यवसायाची ओळख तर होतेच आणि त्या माध्यमातून व्यवसायाविषयी प्राथमिक माहिती देण्याचा देखील प्रयत्न असतो. या लेखामध्ये देखील आपण असाच एका वेगळ्या आणि छोट्या व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत.
हा व्यवसाय ऐकायला आणि स्वरूपाच्या बाबतीत एकदम छोटेखाणी आहे, परंतु व्यवस्थित मार्केटिंग केली तर खूप नफा देण्याची देखील क्षमता आहे.
एक छोटीशी व्यवसाय कल्पना
बिंदी बनविण्याचा व्यवसाय हा घरातील एका खोलीत आणि छोट्या मशीन ने सुरू करता येईल असा व्यवसाय आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची जास्त जागा किंवा मोठीफॅक्टरी उघडण्याची गरज नाही.
नक्की वाचा:Business Idea: टाकाऊ फुलांचा करा असाही वापर, कमवाल भरपूर नफा
आपल्याला माहित आहेच की बिंदीप्रत्येक भारतीय विवाहित महिलेची महत्वाची ओळख असते. मुली आणि महिला त्यांच्या मेकप साठी बिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
अगोदर आपल्याला माहीत होतेच की फक्त गोल आकारामध्ये बिंदी बाजारपेठेत यायचे. परंतु आता अनेक वेगवेगळ्या आकारांच्या आणि आकर्षक डिझाइन्स मध्ये आपल्याला बिंदी बघायला मिळतात.
जर आपण साधारणतः विचार केला तर एक महिला एका वर्षामध्ये 12 ते 14 पॉकेट बिंदी वापरते.अवघ्या दहा हजार रुपये खर्च करून हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.
या व्यवसायासाठी कच्चामाल म्हणून मखमली कापड, चिकट गोंद, क्रिस्टल्स वेगवेगळ्या प्रकारची मणी इत्यादींची आवश्यकता असते.या गोष्टी तुम्हाला बाजारांमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होतात.
लागणारी मशिनरी
व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला डॉट प्रिंटिंग मशीन,डॉट कटर मशीन आणि गमिंग मशीन ची गरज भासते.तसेच इलेक्ट्रिक मोटर आणि एक हॅन्ड टूल आवश्यक असते.
मॅन्युअल मशिनच्या साहाय्याने सुरुवात करता येते. परंतु व्यवसाय जसजसा वाढत जातो तसतसे ऑटो मॅटिक मशीन खरेदी करणे फायद्याचे ठरते.
या व्यवसायातून होणारी कमाई
या व्यवसाय मधून 50 टक्क्यांपेक्षा अधिक बचत करता येते. तुम्ही तयार केलेल्या मालाची व्यवस्थित मार्केटिंग केली आणि व्यवस्थित प्रकारे विक्री केली तर तुम्ही प्रतिमहिना 50 हजार रुपये सहजपणे कमावू शकतात.
या व्यवसायामध्ये मार्केटिंगला खूप महत्त्व आहे. शहरी विभागातील कॉस्मेटिक दुकानाशी तुम्ही संपर्कात राहून तुमच्या मालाची विक्री मार्केटिंगच्या माध्यमातून वाढवू शकतात.
Share your comments