केंद्र सरकारने 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केल्यानंतर आता त्यापाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील मेगा भरतीचे नियोजन सुरू केले असून राज्यातील सर्वच शासकीय विभाग मिळून जवळजवळ पावणेतीन लाख असलेल्या रिक्त जागांपैकी डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास एक लाख पदांची मेगा भरती करण्याचे शासनाने नियोजन सुरू केले
असून शासनाच्या प्रत्येक विभागाकडील मंजूर व रिक्त पदांची आरक्षण पडताळणी अंतिम करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
तसे पाहायला गेले तर मागील चार-पाच वर्षांपासून राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारची मोठी शासकीय भरती राबवली गेलेले नाही.त्यातच कोरोना महामारी मुळे आणखीनच परिस्थिती बिकट बनून ज्या लोकांच्या हातात नोकऱ्या होत्या त्या देखील चालल्या गेल्या.
त्यामुळे बरेच करून हे शासकीय पदभरतीची वाट पाहत असून शासनाने जर लवकरच ही प्रक्रिया सुरू केली तर तरूणांना नक्कीच त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
राज्यातील विविध विभागातील रिक्त पदे आणि भरतीतील अडचणी
राज्याच्या जवळजवळ 43 शासकीय विभागांमध्ये चालू परिस्थितीचा विचार केला तर तब्बल दोन लाख 69 हजार पदे रिक्त आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 60000 पदांच्या मेगाभरती ची घोषणा केली होती. परंतु विविध अडचणींमुळे ती होऊ शकली नाही.
त्यानंतरच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाल्याने एस ई बी सी प्रवर्ग रद्द करावा लागला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मविआ सरकारने सर्व रिक्त पदांचा तपशील मागवला असून त्याचे आरक्षण पडताळणी सुरू केली आहे.
दुसरी एक नोकर भरती सुरू करण्यामागील जमेची बाजू म्हणजे 2024 मध्ये केंद्र सरकारला पाच वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील सुशिक्षित बेरोजगारांचे नाराजी दूर करण्यासाठी दहा लाख पदांची भरती करण्याची मोठी गोष्ट सरकारने केली.
नक्की वाचा:सैन्य भरती संदर्भातील अग्नीपथ योजना नेमकी काय आहे? वाचा सविस्तर
त्या पद्धतीने अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील येणाऱ्या निवडणुकांपूर्वी 200000 पदांच्या भरती चे नियोजन केले आहे.जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांचा नाराजीचा फटका निवडणुकीत बसू नये हा त्यामागील हेतू आहे.
म्हणून त्याच अनुषंगाने जुलै ते डिसेंबर 2022 या सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने एक लाख पदांची भरती होईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. एवढेच नाही तर दोन ते तीन टप्प्यात सप्टेंबर 2024 पर्यंत दीड ते दोन लाख पदांची भरती होऊ शकते असेही सांगण्यात आले.
Share your comments