
life insurence corporation launch bima ratna policy for good and secure investment
बहुतेक जण भविष्यकालीन आर्थिक गरजांसाठी किंवा भविष्यकाळात आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहावायासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करत असतात.
सगळ्यांची अपेक्षा एवढीच असते की आपण केलेल्या गुंतवणुकीतून योग्य परतावा वेळेत आणि सुरक्षितरित्या मिळणे ही होय. गुंतवणुकीसाठी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे पर्याय आहेत.परंतु यामध्ये कमी जोखमीच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते.
यासाठी बरेच जण एलआयसीची निवड करतात. कारण एलआयसी ही लोकांच्या नेमक्या गरजा हेरून त्या पद्धतीनेगुंतवणूक प्लान देत असते.याच पार्श्वभूमीवरलाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसीने विमा रत्न पॉलिसी लॉन्च केली आहे. या लेखात आपण या नवीन पॉलिसी चे धोरण आणि वैशिष्ट्य जाणून घेऊ.
एलआयसीची विमा रत्न पॉलिसी
शुक्रवारी एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाने विमारत्न नावाची एक पॉलिसी लॉन्च केली. या पॉलिसीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही पॉलिसी नॉन लींक्ड, नॉन पार्टिसिपेटेड वैयक्तिक बचत जीवन विमा योजनाआहे. यामध्ये मर्यादित प्रीमियम, हमी जोडणी आणि मनी बॅक विमा पॉलिसी आहे.
याचा अर्थ तुम्हाला कमी प्रीमियम आणि बोनसची हमी मिळेल. विमा रत्न पॉलिसीतील पैसा शेअर बाजारात गुंतवला जात नसल्यामुळे त्या गुंतवणुकीत कुठलाही प्रकारचा धोका नाही.
विमारत्न पॉलिसीसाठी असणारा प्रीमियम
ही पॉलिसी पंधरा वर्षे, 20 आणि पंचवीस वर्षाच्या कालावधीसह उपलब्ध आहे. या तिन्ही पर्यायांमधून तुम्ही कुठलाही मुदत कालावधी निवडू शकता. यामध्ये जर तुम्ही पंधरा वर्षाची निवड केली तर तुम्हाला 11 वर्ष प्रीमियम भरावा लागतो.
जर तुम्ही वीस वर्षाची निवड केली तर तुम्हाला सोळा वर्षे प्रीमियम भरावा लागेल. गुंतवणूकदारांच्या वयाच्या 90 दिवसापासून म्हणजेच विमा रत्न पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी वय कमीत कमी 90 दिवस आणि जास्तीत जास्त 55 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.
या पॉलिसीमध्ये विमा रक्कम ही पाच लाख रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments