1. आरोग्य सल्ला

West Nile Fever: काय आहे नेमका वेस्ट नाईल ताप?या तापामुळे केरळ मध्ये पहिला मृत्यू, जाणून घ्या लक्षणे

वेस्ट नाईल तापामुळे केरळ मध्ये पहिली मृत्यूची घटना समोर आली असून त्रिशूर जिल्ह्यात वेस्ट नाईल तापामुळे एका 47 वर्षा व्यक्तीचा मृत्यू झाला.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
first death registerd in keral due to west nile fever so take precaution

first death registerd in keral due to west nile fever so take precaution

 वेस्ट नाईल तापामुळे केरळ मध्ये पहिली मृत्यूची घटना समोर आली असून त्रिशूर जिल्ह्यात वेस्ट नाईल  तापामुळे एका 47 वर्षा व्यक्तीचा मृत्यू झाला.

या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने  या तापाच्या बाबतीत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून लोकांना सावध राहन्यास सांगितले आहे. या बाबतीत केरळच्या आरोग्य विभागाने सांगितले की, वेस्ट नाईल ताप हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे होतो.

हा रोग प्रथम 1937 मध्ये युगांडा या देशात सापडला होता. भारतात 2011 मध्ये या तापाचे पहिली केस केरळमध्ये नोंदवली गेली होती व 2019 मध्ये मल्लपूरम मधील एका सहा वर्षाच्या मुलाचा तापामुळे मृत्यू झाला होता.

 वेस्ट नाईल तापाची लक्षणे आणि कारणे           

 या तापाची लक्षणे इतर कोणत्याही विषाणुजन्य तापासारखी असतात. यामध्ये प्रामुख्याने डोकेदुख, ताप, अशक्तपणा इत्यादी लक्षणे आढळतात. तसेच कधीकधी मज्जा संस्थेशी लक्षणे देखील होऊ शकतात. ज्यामध्ये दिशाभूल आणि दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणे होऊ शकतात.

हा ताप प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पसरतो. जसे इतर मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे हजार डासांमुळे पसरतात तसाच आजार देखील डासांमुळे पसरतो. प्रामुख्याने संक्रमित डास चावणे हे सर्वात मोठे वेस्ट नाईल तापाचा संसर्ग  होण्याचे प्रमुख कारण आहे.

तसेच फक्त संक्रमणाच्या माध्यमातून, प्रयोगशाळांमध्ये विषाणूच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित मातेकडून तिच्या मुलांमध्ये हा संसर्ग पसरू शकतो.केरळचा आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांना विनंती केली की त्यांनी ताप किंवा आजाराची इतर लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात दाखल करावे.  जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे असेही त्यांनी म्हटले.

या तापामध्ये जपानी तापासारखेच लक्षणे आहेत मात्र काळजी करण्यासारखे काही कारण नाही, असा देखील  केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Mango Museam: 12.5 एकर वर आहे हे आंबा संग्रहालय, 230 हून अधिक आंब्याच्या जाती आणि वार्षिक उत्पन्न 24 लाखापेक्षा अधिक

नक्की वाचा:आता पालेभाज्या आणायला बाजारात जायची गरज नाही; आता घरीच करा या भाज्यांची लागवड

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो मिश्र मत्स्यव्यवसायामुळे उत्पन्नाचे दरवाजे उघडतील, होईल मोठा नफा

English Summary: first death registerd in keral due to west nile fever so take precaution Published on: 30 May 2022, 10:02 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters