LIC ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्या योजनांमध्ये गुंतवणूक करून अनेकजण कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकतात. LIC ची अशीच एक खास योजना आहे. जीवन उमंग पॉलिसी योजना (Jeevan Umang Policy) ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.
जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळवायचा असेल तर LIC जीवन उमंग पॉलिसी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. अगदी कमी गुंतवणुकीसह तुम्हाला 36,000 रुपये वार्षिक परतावा मिळू शकतो. LIC ची जीवन उमंग पॉलिसी अनेक प्रकारे इतर योजनांपेक्षा वेगळी आहे.
पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून आज 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
55 वर्षांपर्यंतचे लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. यामध्ये लाइफ कव्हरसह मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम उपलब्ध आहे. मुदतपूर्तीनंतर दर वर्षी तुमच्या खात्यात निश्चित उत्पन्न येईल. पॉलिसीधारकाच्या (policy) मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळेल. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते 100 वर्षांपर्यंतचे कव्हरेज देते.
दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप
36 हजार रुपये वार्षिक उपलब्ध होतील
जर तुम्ही या पॉलिसीमध्ये दरमहा रुपये 1 हजार 350 प्रीमियम भरला तर एका वर्षात ही रक्कम 16 हजार 200 रुपये होईल. जर ही पॉलिसी 30 वर्षे टिकली तर ही रक्कम सुमारे 4 लाख 86 हजार रुपयांपर्यंत वाढते. तुमच्या गुंतवणुकीवर 31 व्या वर्षापासून कंपनी तुम्हाला दरवर्षी 36 हजारांचा परतावा देण्यास सुरुवात करते.
या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूकदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास टर्म रायडर बेनिफिट (Term Rider Benefit) देखील उपलब्ध आहे. ही पॉलिसी घेतल्याने, आयकर कलम 80C अंतर्गत देखील कर सूट मिळते. जर एखाद्याला जीवन उमंग पॉलिसीची योजना घ्यायची असेल तर त्याला किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल.
महत्वाच्या बातम्या
मुसळधार पावसामुळे हजारो क्विटंल लाल मिरचीचे नुकसान; शेतकऱ्यांना मोठा फटका
दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
सावधान! तुम्ही नकली आले तर वापरत नाही ना? असे ओळखा अस्सल आणि नकली आले
Share your comments