आपले डोळे हे निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी अणि अनमोल देणगी आहे.कारण डोळयांमुळेच आज आपल्याला ह्या सृष्टीतील निसर्गाने निर्माण केलेले प्रत्येक सौंदर्य पाहता येते आहे.त्याला अनुभवता येते आहे.ह्या जगात सगळयांनाच हे नशीब प्राप्त होत नसते ह्या जगात असेही काही मुले,मुली,आहेत ज्यांची लहानपणीच एखाद्या अपघातात आपली दृष्टी गेली आहे किंवा ते जन्मतच अंध आहेत.
त्यांना ह्या सृष्टीचे सौंदर्य स्वताच्या डोळयांना बघायचे आहे.अनुभवायचे आहे.पण डोळयांची दृष्टी गेल्याने त्यांना हे सर्व करता येत नाही.निसर्गाच्या ह्या अनमोल सौंदर्याचा आनंद उपभोगता येत नाही.म्हणूनचदरवर्षी 10 जुन रोजी जागतिक दृष्टि दान दिनी जनतेला नेत्रदानाचे महत्व सांगितले जाते.आपण नेत्रदान का करायला हवे याची आवश्यकता का आहे?आणि किती आहे हे लोकांना समजावून सांगितले जाते.लोकांना नेत्रदान करण्यासाठी प्रेरित तसेच प्रोत्साहित केले जाते. एखादे शिबिर आयोजित करून यादिवशी गरजु मुलामुलींना नेत्रदान केले जाते.
आपण एखाद्या अंध व्यक्तीला आपले डोळे दान करून कसे त्याच्या अंधारमय जीवणात प्रकाश निर्माण करू शकतो याची जाणीव विविध कार्यक्रम,उपक्रम राबवून त्यादवारे लोकांना यादिवशी करून दिली जाते.आणि हे कार्य करण्यासाठी आज समाजात अनेक संस्था संघटना कार्यरत देखील आहे.आपण गरजू मुलामुलींना आपले नेत्रदान करून कशापदधतीने देशाच्या भवितव्याचे रक्षण करू शकतो कशी समाजाची सेवा करु शकतो कसा आपला घेतलेला एक चांगला निर्णय एखाद्याचे आयुष्य बदलु शकतो हे सांगण्यात येते.
आज जगभरात लाखो लोक मरण पावतात त्यातील प्रत्येकाने जर मृत्युपुर्वी नेत्रदानासाठी आपली नाव नोंदणी केली आणि मरणानंतर आपले डोळे एखाद्या अंध गरजु व्यक्तीला दिले तर जगात अंधारामध्ये जीवन जगत असलेल्या अनेकांच्या जीवणात प्रकाश निर्माण होईल.जगात अंधव्यक्तींच्या असलेल्या अमाप संख्येत घट होईल.जगातील सर्व अंधांच्या जीवणाला प्रकाश मिळेल.आपल्या देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य असणारया अनेक अंध मुलामुलींच्या चिमुरडयांच्या जीवणात प्रकाशाची लाट येईल आणि त्यांना देखील आपले आणि देशाचे भवितव्य घडवता येईल.
Share your comments