परंतु याच दुधामुळे तुमच्या शरीराला आता धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुधात भेसळ होण्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की दुधात भेसळ करण्यासाठी फक्त पाणीच नाही तर, आणखी काही गोष्टींचाही वापर करण्यात येतो जे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे दुधात काय काय भेसळं केलेलं असू शकते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.कृत्रिम दुधाची ओळख दुधातील भेसळ वासाने शोधली जाऊ शकते. जर त्याला साबणाचा वास येत असेल तर हे दूध कृत्रिम आहे.
कारण खऱ्या दुधाला साबणाचा वास येत नाही. त्याच वेळी, एका वाडग्यात दुधाचे काही थेंब टाका आणि त्यात हळद मिक्स करा. जर हळद लगेच घट्ट होत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्यात भेसळ झाली आहे.दुधात डिटर्जंट भेसळ ही भेसळ पाहाण्यासाठी सर्वप्रथम थोडे दूध आणि पाणी समान प्रमाणात घ्या. त्याला नीट ढवळून हलवा असे केल्याने दुधाला फेस येईल, थोड्याप्रमाणात फेस येणे सामान्य आहे परंतु जास्त आणि साबणासारखा जास्त फेस आला तर समजुन जा की, यात डिटर्जंटची भेसळ केली आहे. या व्यतिरिक्त, आपल्या तळहातावर थोडे दूध चोळा. जर दुधात डिटर्जंटची भेसळ असेल, तर तुम्हाला तुमच्या हातावर स्निग्धपणा येईल.
दूधात पाण्याची भेसळ बऱ्याचदा लोकांना शंका येते की, दुधात पाणी मिसळले आहे परंतु हे तपासण्याचा किंवा हे सिद्ध करण्याचा त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की तुम्ही घरी साध्या पद्धतीने दुधात पाण्याची होणारी भेसळ तपासू शकता.सर्व प्रथम, गुळगुळीत लाकडी किंवा दगडाच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. शुद्ध दुधाचा एक थेंब हळूहळू पांढरा रंग सोडून वाहून जाईल, तर भेसळयुक्त पाण्याचा एक थेंब कोणताही रंग किंवा डाग न सोडता वाहून जाईल.युरियाचा वापर युरियाचा वापर दूध घट्ट करण्यासाठीही केला गेला जातो.
हे तपासण्यासाठी, तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा दूध घाला. त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर घालून चांगले मिक्स करा. थोड्यावेळानंतर त्यात लाल लिटमस पेपर टाका, अर्ध्या मिनिटानंतर जर हा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया मिसळला आहे.जर आपल्याला या पद्धतीने दुधाची गुणवत्ता ठरवता येत नसेल तर आपल्या जवळील लॅब मध्ये ही टेस्ट करू शकता.जर त्याला साबणाचा वास येत असेल तर हे दूध कृत्रिम आहे. कारण खऱ्या दुधाला साबणाचा वास येत नाही. त्याच वेळी, एका वाडग्यात दुधाचे काही थेंब टाका आणि त्यात हळद मिक्स करा. जर हळद लगेच घट्ट होत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्यात भेसळ झाली आहे.
Nutritionist & Dietician
Naturopathist
Amit Bhorkar
whats app: 9673797495
Share your comments