1. इतर बातम्या

एका सायकलची किंमत हिरो स्प्लेंडर मोटरसायकलच्या बरोबर असेल तर! हो त्याच किमतीची सायकल केटीएमने केली भारतात लॉन्च

केटीएमची बाईक्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु याच केटीएम ने शिकागो डिस्क 271 बाईक भारतामध्ये मंगळवारी लॉन्च केली. नाईन्टी वन सायकल साईडने केटीएम सोबत एक विशेष भागीदारी केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ktm lonch shikago disk 271 bicycle in india at tuesday

ktm lonch shikago disk 271 bicycle in india at tuesday

 केटीएमची बाईक्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु याच केटीएम ने शिकागो डिस्क 271 बाईक भारतामध्ये मंगळवारी लॉन्च केली. नाईन्टी वन सायकल साईडने केटीएम सोबत एक विशेष भागीदारी केली आहे.

ज्याचा वापर केटीएम सायकल भारतात विकण्यासाठी केला जाईल. ही सायकल केटीएम कंपनीने तीन प्रकारांमध्ये लॉंच केली असून  या सायकलचे वजन 15 किलो आहे. या सायकलचे त्याच्या वर्गातील सर्वात हलके मॉडेल म्हणून वर्णन करण्यात आले आहे. याबाबतीत कंपनीचे मत आहे की भारतात सायकल चालवणे वेगवेगळ्या वयोगटासाठी सामान्य आहे. आता गरीब आणि श्रीमंत असा भेद सायकल चालकांमध्ये राहिलेला नसून सर्वच वर्गात सायकलींचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे बरेच लोक दैनंदिन प्रवासआणि आरोग्य चांगले राहावे त्याचा एक भाग म्हणून सायकलिंग करतात.

 ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी ही सायकल तीन आकारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त 15 किलो वजनाची ही सायकल त्याच्या विभागातील सर्वात हलके मॉडेल म्हणून वेगळी आहे. वजन कमी असल्यामुळे ती एकदम आरामशीर पद्धतीने चालवता येते

 सायकल ची वैशिष्ट्ये

 हे सायकल टी एल सुसंगत रिमिक्स ने सुसज्ज आहे. याबाबतीत कंपनीचा दावा आहे की शिकागो डिस्क 271 नवीन एमटीबी बाईक आहे. मजबूत टी एल कंपॅटीबल रिम्ससह सुसज्ज, केटीएम लाईन रायझर 680 एम एम हॅण्डल बार प्रमुख्याने माऊंटन बाइकिंग साठी डिझाईन केलेले आहे.

हिरो स्प्लेंडर बाईक ची भारतीय मोटरसायकल बाजारात लोकप्रियता असून या स्प्लेंडर बाईक ची एक्स शोरूम दिल्ली किंमत 69380 रुपये  आहे. त्याच वेळी केटीएम शिकागो डिस्क 271 सायकलची किंमत देखील जवळपास 63 हजार रुपये आहे.(स्रोत-tv9 मराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Cotton Crop : येत्या हंगामात पण बोंडअळीमुळे कापसाचं वाटोळं अटळ; कृषी विभागाने जारी केला अनमोल सल्ला; वाचा

नक्की वाचा:Poultry : कडकनाथने बदलले महिला शेतकऱ्याचे नशीब!! एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करणारी महिला आज बनली मालक

नक्की वाचा:Success : टरबूज लागवड केले आणि अवघ्या अडीच महिन्यात मिळवले दहा लाखांचे उत्पन्न

English Summary: ktm lonch shikago disk 271 bicycle in india at tuesday Published on: 27 April 2022, 10:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters