तेव्हा अशा प्रसंगी एखादी छानशी गृह विमा पॉलिसी असणे फायदेशीर असते. तेव्हा आपण या लेखामध्ये गृह विमा पॉलिसी बद्दल माहिती घेऊ.
1) गृह विमा पॉलिसी नेमकी काय आहे?
आपल्या घराला मुसळधार पाऊस, महापूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती तसेच एखादा जातीय हिंसाचार, दंगल, जाळपोळ इत्यादी मानवनिर्मित संकटांमुळे संरक्षण मिळावे त्यासाठी गृह विमा पॉलिसी असते.
2) गृह विमा पॉलिसीत समाविष्ट घटक:
1) घर भाडे :- जर आपल्या घराचे नुकसान झाले आणि तिथे राहण्यायोग्य राहिले नसेल तर संबंधित घराची पुनर्बांधणी होईपर्यंत किंवा त्याची पूर्ण डागडुजी होईपर्यंत घर मालकाला राहण्यासाठी एखाद्या पर्यायी निवासाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था साठी लागणारे भाडे किंवा जर ते घर भाडेकरूंना भाड्याने देऊन उत्पन्न सुरू असेल तर त्या उत्पन्नाची देखील या पॉलिसीत तरतूद आहे.
2) घरातील साहित्य:- या पॉलिसीमध्ये घरातील साहित्य, फर्निचर, मौल्यवान वस्तू, टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन, ऐयर कंडिशनर,लॅपटॉप, कपडे इत्यादी वस्तू जसे प्लेट ग्लास इत्यादी गोष्टींना देखील या पॉलिसी द्वारे संरक्षण मिळते.
3) बांधकाम खर्च:- घराचे किंवा संबंधित फ्लॅटचे जर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटकांमुळे नुकसान झाले तर असल्या ओढावणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गृह विमा असतो.
4) अपघात विमा आणि थर्ड पार्टी लायबिलिटी:- घरातील सदस्य, घर काम करणारे नोकर यांच्याबरोबर घरातील इतर काही कारणांमुळे तिऱ्हाईत व्यक्तीस अपघात झाल्यास त्यासाठी देखील ही विमा पॉलिसी तरतूद आहे.
5) लॉकर मधील दागिने :- आग, भूकंप, महापुर, घरफोडी आदी कारणांमुळे बँकेतील लॉकर मध्ये ठेवलेले दागिने आणि घरातील दागिने यांचे नुकसान झाल्यास या पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण मिळते.
Share your comments