1. इतर बातम्या

ऐका बुलडोझरची कहानी! काय आहे बुलडोझरचे खरे नाव आणि केव्हा झाले पहिल्यांदा हे यंत्र तयार?

आपल्या सगळ्यांना बुलडोझर माहिती आहे. बुलडोजर म्हटली म्हणजे डोळ्यासमोर येते तोडफोड, खोदकाम, अशक्य वाटणारी कामे शक्य करणारे यंत्र आणि आकाराच्या दृष्टीने एकदम अवाढव्यअसे एक चित्र येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
know about basic information buldozer machine and that company

know about basic information buldozer machine and that company

आपल्या सगळ्यांना बुलडोझर माहिती आहे. बुलडोजर म्हटली म्हणजे डोळ्यासमोर येते तोडफोड, खोदकाम, अशक्य वाटणारी कामे शक्य करणारे यंत्र आणि आकाराच्या दृष्टीने एकदम अवाढव्यअसे एक चित्र येते.

 परंतु आपल्याला कधी माहिती आहे का? या यंत्राचे खरे नाव काय आहे? या यंत्राची निर्मिती पहिल्यांदा कधी आणि कोणी केली? या व इतर अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊ.

 काय बुलडोझरचे खरे नाव?

 बुलडोजर ला आपल्यापैकी बरेच जण जेसीबीम्हणतात.परंतु खरे पाहायला गेले तर जेसीबी हे त्याचे नाव नाही.तर जेसीबी ही कंपनी बुलडोजर बनवते. यंत्राचे खरे नाव बुलडोजर किंवा जेसीबी नसून बॅकहो लोडर असे आहे. जेसीबी ही कंपनी बुलडोझर बनवते. या कंपनीची स्थापना 1945 मध्येकरण्यात आली व जवळजवळ 1953 मध्ये या कंपनीने पहिला बॅकहो लोडर बनवला.

अगोदर निळा आणि लाल रंगात असणारे हे यंत्र नंतर अपग्रेड करून 1964 मध्ये पिवळ्या रंगाचे यंत्र तयार करण्यात आले. तेव्हापासून तर आत्तापर्यंत या मशीन चा रंग पिवळा ठेवला गेला आहे. अगदी सुरुवातीला हे मशीन ट्रॅक्टर च्या साह्याने बनवले गेले होते. परंतु कालांतराने याच्यामध्ये अपडेट केले जाऊन त्याचे मॉडेल बदलले गेले.  आपल्याला माहित आहेच कि हे बॅकहोलोडर दोन्ही प्रकारचे कार्य करतो. याला ऑपरेट करण्यासाठी स्टेरिंग नसून लिव्हर द्वारे ऑपरेट  केले जाते. एका बाजूला स्टिअरिंग असते तर दुसऱ्या बाजूला क्रेन सारखे लिव्हर आहेत. या मशीनच्या एकाबाजूला लोडर असून  त्याद्वारे कुठलीही वस्तू सहजपणे उचलली जाते. या व्यतिरिक्त दुसऱ्या बाजूला बकेट आहे. जेसीबी कंपनी चे पूर्ण नाव जेसीबी एक्झाव्हेटर लिमिटेड असून एक ब्रिटिश कंपनी आहे व तिचे मुख्यालय रॉचेस्टर, स्टेफोर्डशायर येथे आहे. ही कंपनी अवजड यंत्रे निर्मितीसाठी ख्यातनाम आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव जोसेफ सीरील बामफोर्ड असून ते एक अब्‍जाधीश आहेत व त्यांच्या नावावरून जेसीबी हे नाव देण्यात आले आहे. जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये या कंपनीचे पाचप्लांट असून एक डिझाईन सेंटर आहे. भारतामध्ये या कंपनीचा सहावा कारखाना वडोदरा येथे बांधला जात असूनया कंपनीने भारतातबनवलेल्या यंत्रांची 110 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते.

 बॅकहोलोडर अर्थात बुलडोजर तयार करणाऱ्या इतर कंपनी

 भारतात ए सी इ, एल अँड टी,व्हालवो आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या ख्यातनाम कंपन्या देखील हे मशीन बनवतात. यंत्राची किंमत दहा लाख रुपये पासून 40 ते 50 लाख रुपये फायदा असते.( स्रोत- दिव्य मराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:गुलखैरा नाव ऐकलं आहे का कधी? ही आहे औषधी वनस्पती, लागवड केली तर मिळू शकतो दुप्पट नफा

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो विक्रेत्यांनी खताचा साठा केल्यास माहिती द्या, साठा आढळल्यास जिल्हाधिकारी कारवाई करणार..

नक्की वाचा:ऊस उत्पादनवाढीत मेन फॅक्टर आहे गंधक; ठरेल ऊस उत्पादन वाढीतील महत्त्वाचा घटक

English Summary: know about basic information buldozer machine and that company Published on: 26 April 2022, 09:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters