1. कृषीपीडिया

गुलखैरा नाव ऐकलं आहे का कधी? ही आहे औषधी वनस्पती, लागवड केली तर मिळू शकतो दुप्पट नफा

सध्या शेतीमध्ये शेतकरी विविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची पिकांची लागवड करून शेती आधुनिक झाली आहे. बरेचसे शेतकरी सध्या औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-news NCR

courtesy-news NCR

सध्या शेतीमध्ये शेतकरी विविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची पिकांची लागवड करून शेती आधुनिक झाली आहे. बरेचसे शेतकरी सध्या औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय देखील  औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. आता आपल्याला माहिती आहे की औषधी वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये अश्वगंधा, शतावरी, ब्राम्ही, तुळस इत्यादी होय. परंतु यामध्ये गुल खैरा एक औषधी वनस्पती आहे. या फुलाची देठ, पाने आणि बियांना बाजारात खूप मागणी आहे चांगल्या भावात देखील त्या विकल्या जातात. त्यामुळे हे फुल शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. जर शेतकऱ्यांनी याची लागवड केली तर शेतकऱ्यांना दुप्पट नफा मिळू शकतो.

 गुलखैरा विषयी अधिक माहिती

 आता आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी गुलखैराची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कोणत्याही पिकाच्या दरम्यान याची लागवड करू शकतात. हे एक औषधी असून या फुलाची पाने, देठ आणि बिया बाजारामध्ये चांगल्या दरात विकल्या जातात.

 त्यामुळे या फुलांची लागवड करून शेतकऱ्यांना दुप्पट नफा सहजरीत्या मिळू शकतो. जर याची बाजारातील किंमत पाहिली तर शंभर रुपयांपर्यंत हे विकले जाते. एक एकर लागवड केली तर 15 क्विंटल गुलखैरा निघतो त्याचे सुमारे दीड लाख रुपयांना विक्री होते. गुल खैराचे फुले, पाने आणि देठ यांचे ग्रीक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुरुषांच्या अनेक प्रकारच्या टॉनिक मध्ये हे फुल वापरले जाते या व्यतिरिक्त या फुलापासून बनवलेला औषध ताप, खोकला आणि इतर अनेक आजारांवर खूप प्रभावी आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या सारख्या देशांमध्ये घेतली जाणारी ही वनस्पती आता भारतात देखील घेतली जात असून त्याची लागवड सुरू झाली आहे. भारतातील उत्तर प्रदेश मध्ये आणि शेतकरी त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत व चांगला नफा कमवत आहेत.

कन्नोज आणि हरदोई सारख्या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करताना दिसतात. आपल्याकडेदेखील पॉली हाउस मध्ये अनुकूल हवामान आणि योग्य प्रमाणात सिंचन आणि खात असलेल्या कोणत्याही वनस्पतीची लागवड करणे शक्‍य आहे. (स्त्रोत-किसानराज)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Organic Fertilizer : शेणखताची डिमांड वाढली!! एक ट्रकची किंमत ऐकून बसेल शॉक

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो तुम्ही कष्ट करता पण 'या' कारणामुळे पिकांचे उत्पादन होते कमी, जाणून घ्या..

नक्की वाचा:Sugarcane Farming : ऊसाचे क्षेत्र असेच वाढत राहिले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल : नितीन गडकरी

English Summary: gulkhaira is medicinal plant that can give more profit to farmer Published on: 25 April 2022, 09:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters