1. इतर बातम्या

गोंधळ उडतो का? प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि पंतप्रधान किसान पेन्शन योजना आहेत एकच, वाचा सविस्तर

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना सहाय्यक म्हणून विविध प्रकारची योजना सुरू केल्या गेल्या आहेत.प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना ती सगळ्यात परिचित असून या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kisan maandhan scheme and kisan pention scheme are same

kisan maandhan scheme and kisan pention scheme are same

केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना सहाय्यक म्हणून विविध प्रकारची योजना सुरू केल्या गेल्या आहेत.प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना ती सगळ्यात परिचित असून या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात.

या सगळ्या योजना या प्रधानमंत्री किसान कल्याण योजनेतील आहेत.

 त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना तसेच या योजनेला पंतप्रधान किसान पेन्शन योजना म्हणून ही ओळखली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी पेन्शन म्हणून 36 हजार रु मिळू शकतात. या योजने विषयी या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:नंदाची बातमी! बीएएसएफ कंपनीने ऊस आणि मका पिकासाठी लाँच केले कीटकनाशक वेसनिट कम्प्लिट

1) प्रधानमंत्री किसान मानधन योजना / पंतप्रधान किसान पेन्शन योजना :

 ही योजना केंद्र सरकारने 31 मे 2019 मध्ये सुरू केली आहे. केंद्र सरकारने देशातील अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून योजना सुरु केली आहे. इयत्ता पेन्शन योजना असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर प्रतिमाह तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाते.

2) या योजनेसाठी लाभार्थी पात्रता :

 या योजनेमध्ये देशातील कोणत्याही अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी गुंतवणूक करू शकतात. लाभार्थ्यांचे वय हे किमान 18 ते कमाल 40 वर्ष असावे. तसेच त्याच्याकडे दोन हेक्‍टर किंवा त्याहून कमी शेतजमीन असावी.

नक्की वाचा:मोठी बातमी! कांद्याच्या दरात मोठी घसरण म्हणून केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पत्र, निघेल का यावर तोडगा?

3) किसान पेन्शन / मानधन योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे :

1) लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड

2) ओळख पत्र

3) लाभार्थ्याचे वयाचे प्रमाणपत्र

4) लाभार्थ्याचा उत्पन्नाचा दाखला

5) लाभार्थ्याच्या नावे असलेल्या शेतजमिनीचा सातबारा उतारा

6) बँक खाते पासबुक

7) मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो

4) या योजनेसाठी नोंदणी कशी करावी:

 या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर वर नोंदणी करता येईल. तसेच तुम्ही स्वतः देखील यासाठी मोजणी करू शकता. यासाठी सर्वप्रथम या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ maandhan. in वर जावे लागेल या संबंधित संकेतस्थळावर गेल्यानंतर लॉगिन करण्यासाठी maandhan. in /auth / login या पेजवर हेअर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करावे. लॉगिग दरम्यान लाभार्थ्यास त्याचा स्वतःचा फोन नंबर टाकावा लागेल. याशिवाय स्वतःचे नाव, पत्ता, कॅप्टचा कोड इत्यादी सर्व माहिती व्यवस्थित प्रविष्ट करावी. त्यानंतर जनरेटर ओटीपी या पर्यायावर क्लिक करून आपल्या मोबाईल वर आलेला एक ओटीपी टाकावा.

त्यानंतर एक अर्ज आपल्यासमोर येतो अर्जामध्ये सांगितलेली माहिती भरून सबमिट केल्यानंतर संबंधित अर्जाचे प्रिंटआऊट काढता येते.

5) या योजनेचे स्वरूप :

 या योजनेमध्ये नियमानुसार एखादा शेतकरी 18 वर्षे वयाचा असेल तर त्याला दरमहा 55 किंवा वर्षाकाठी 660 रुपये जमा करावे लागतात.त्यानंतर संबंधित लाभार्थ्याने वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर त्याला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेमध्ये सरकारने प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी जमा करण्यासाठी ची वेगवेगळी रक्कम दरमहा प्रमाणे निश्चित केली आहे. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये आपण स्वतः जेवढे पैसे जमा करतो. तेवढे पैसे सरकारही जमा करते. 

तसेच या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर लाभार्थ्यांनी योजनांमध्ये सोडली किंवा पैसे जमा करणे थांबवले तर जमा केलेले पैसे सुरक्षित राहतात तसेच जमा केलेल्या रकमेवर बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजा इतके व्याज मिळते. जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के पैसे मिळत राहतात.

English Summary: kisan maandhan and kisan penstion scheme are same that not diffrent Published on: 26 March 2022, 04:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters