नवी दिल्ली : नोकरी हा लोकांसाठी खूप महत्त्वाचा उत्पन्नाचा मार्ग असतो. नोकरी करायच्या उद्देशाने अनेक तरुण शिक्षण घेतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये सध्या अनेक पदांसाठी भरती सुरू असून आघाडीची आयटी कंपनी असलेल्या Infosys ने ५५००० नोकऱ्यांची संधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.ग्लोबल हायरिंग अंतर्गत या नोकऱ्या उपलब्ध केल्या जाणार असून इन्फोसिस सध्या गुंतवणूक (Investment) वाढवण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयटी कंपन्या आपल्याकडील अनेकविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर देश हळूहळू सावरत असताना सरकारी क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. यातच आता आघाडीची IT कंपनी असलेल्या Infosys नेही ५५ हजार नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे.
इन्फोसिस (Infosys) या कंपनीमध्ये सध्या २ लाख ९२ हजार ६७ इतके कर्मचारी काम करतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ३९.६ % असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय TCS मध्ये ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी व Wipro मध्ये २ लाख ३१ हजार ६७१ कर्मचारी कार्यरत आहेत.
IT कंपन्यांनी कमावला भरपूर नफा (Profit)
कोरोनाच्या काळात देखील या IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नफा मिळवला असून या कंपन्यानी आपले तिमाहीचे परिणाम (Result) नुकतेच जाहीर केले आहेत. त्यानुसार Infosys चा नफा ५ हजार १९७ कोटींवरून ५ हजार ८०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, TCS ने याच कालावधीत ९ हजार ७६९ कोटी रुपये, तर Wipro ने २ हजार ९७० कोटी रुपयांचा नफा (Profit) कमावला.
इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या ३९ टक्के
Infosys कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसंबर २०२० मध्ये इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ३१२ होती. ती वाढून डिसेंबर २०२१ मध्ये २ लाख ९२ हजार ०६७ इतकी झाली आहे. यापैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३९.६ टक्के असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, TCS, Infosys आणि Wipro यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी आपले तिमाहीचे परिणाम जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या कंपन्यांना प्रचंड चांगला नफा झाल्याचे सांगितले जात आहे. Infosys चा नफा ५ हजार १९७ कोटींवरून ५ हजार ८०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Share your comments