देशामध्ये कामगार कायद्याबाबत सुधारणा करण्यात येत असून लवकरच लागू होणार या कामगार कायद्यांमध्ये संघटित आणि विना संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक नवीन तरतुदी समाविष्ट करण्यात आले असून ते कामगारांसाठी खूप फायद्याच्या ठरतील. म्हणजे एकंदरीत आताच्या कामगार कायद्यानुसार ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचा बदल करण्यात येणार आहे.
नक्की वाचा:ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये भाव द्या अन्यथा ऊसतोड नाही
काय आहे नवीन कामगार कायदा?
आता नवीन तरतुदी अंतर्गत एका आठवड्यामध्ये 48 तासांपेक्षा जास्त काम काम कामगाराकडून घेतली जाऊ शकत नाही. या अंतर्गत आता नियुक्त आणि कर्मचारी यांच्या सहमतीने संबंधित कर्मचारी आठवड्यात 48 तासांचे काम चार दिवसात देखील पूर्ण करू शकतील व इतर दिवस सुट्टी घेऊ शकेल.
जर आत्ताच्या दीर्घ सुट्टीच्या बाबतीतील नियम पाहिला तर 240 दिवसांपर्यंत ड्युटी केल्यानंतरच दीर्घ सुट्टीचा हक्क मिळतो परंतु नव्या तरतुदीनुसार असता 180 दिवस काम केले तरी कामगारांना दीर्घ सुट्टी घेता येणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या काही महिला कर्मचारी असतील त्यांना आता रात्रपाळीत काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव टाकता येणार नाही.
नक्की वाचा:दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
तसेच या नवीन कामगार कायद्यानुसार आता संबंधित कामगारांच्या हातात पगार कमी येईल परंतु प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युईटी मिळेल. कामगारांच्या कामाचे जी काही निश्चित वेळ आहे त्या वेळपेक्षा जर पंधरा मिनिटे देखील जास्त काम घेतले गेले तरी कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम मिळेल.
राज्यांमधील या कायद्याच्या बाबतीत स्थिती
या कायद्याला 31 पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी तत्त्वतः मान्यता दिली असून काही राज्यांनी या कायद्यातील काही मुद्यांवर आक्षेप नोंदविला आहे व त्यावर चर्चा सुरू आहे. हा कायदा केव्हा पासून लागू होईल याची तारीख निश्चित नाही परंतु तर लवकरच लागू केला जाईल असे देखील मंत्रालयाचे म्हणणे आहे.
Share your comments