1. बातम्या

ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये भाव द्या अन्यथा ऊसतोड नाही

बळीराजा शेतकरी संघटनेची पहिली ऊस परिषद पाचवडेश्‍वर मंदिर, पाचवड (ता. कराड) येथे पार पडली. या परिषदेतेत ऊसाला एकरकमी एफआरपी अधिक 1 हजार रुपये प्रमाणे प्रतिटन 4 हजार रुपये द्या. उसाचे वजन काट्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात यावे.

ऊस परिषद

ऊस परिषद

बळीराजा शेतकरी संघटनेची पहिली ऊस परिषद पाचवडेश्‍वर मंदिर, पाचवड (ता. कराड) येथे पार पडली. या परिषदेतेत ऊसाला एकरकमी एफआरपी अधिक 1 हजार रुपये प्रमाणे प्रतिटन 4 हजार रुपये द्या. उसाचे वजन काट्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात यावे.

शेतकर्‍यांना दिवसा 10 तास मोफत वीज देण्यात यावी. उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के नफा या धर्तीवर शेतमालाला हमीभाव सरकारने जाहीर करावा. अश्या मागण्या करण्यात आल्या.

एफआरपीचा पूर्वीप्रमाणे 8.5 टक्के बेस करण्यात यावा आणि नवीन साखर कारखान्यासाठी अंतराची अट रद्द करण्यात यावी, असे सहा ठराव बळीराजा शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले.

ऐकावे ते नवलंच! चक्क विहीर चोरीला गेली! काय आहे अजब गजब प्रकार जाणून घ्या..

पंजाबराव पाटील म्हणाले, सध्या जागतिक बाजारात साखरेला भाव चांगला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना साखर कारखानदारांनी चालू हंगामासाठी एकरकमी एफआरपी अधिक एक हजार रुपये देणे सहज शक्य आहे. परंतू कारखानदारांनी शेतकरी आंदोलन करीत नाही, याचा फायदा घेऊन ऊसाला भाव द्यायचा नाही हे ठरवले आहे.

मागील पाच वर्षांमध्ये ऊसाला एक रुपया सुध्दा भाव वाढलेला नाही. परंतू मागील पाच वर्षात उसाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर निघण्याचा एकच मार्ग ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटित होऊन गावागावातून उठाव केला पाहिजे.

"शिवसेना तर अजिबात..!" सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया..

उसाला जोपर्यंत कारखानदार एकरकमी एफआरपी जाहीर करत नाहीत, तोपर्यंत उसाला तोडी द्यायची नाही. बळीराजा शेतकरी संघटनेच्या पहिल्या ऊस परिषदेला सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

ओडिशाचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार

English Summary: Price sugarcane at 4 thousand rupees per ton Published on: 09 October 2022, 03:42 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters