विधान परिषदेच्या दहा जागांसाठी काल झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारल्याचे दिसले. भाजपचे सर्व पाचही उमेदवार निवडून आले असून महा विकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला.
राज्यसभा निवडणुकीच्या नंतरही विधानपरिषदेत देखील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जलवा कायम राहिला. भाजपला पहिल्या पसंतीची 134 तर महाविकास आघाडी ला 151 मते मिळाली.
काल नऊ वाजता मतदानास प्रारंभ करून सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व 285 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे दीड तास मतमोजणी रखडली.
नक्की वाचा:आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी 'महिलांची शेतीशाळा'; उपक्रमाची होतीये राज्यभर चर्चा
त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती दोन्ही मते बाद ठरवली. उरलेली 283 मतपत्रिका ची रात्री नऊ वाजता छाननी पूर्ण झाली.
त्यामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांवर भाजपच्या पाच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी ठरले. दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्या दुसऱ्या फेरीमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. रात्री साडेदहा वाजता दुसऱ्या फेरीत भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप विजय झाले.
नक्की वाचा:7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यापासून 'इतका' वाढणार पगार
महा विकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते
1- एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस - मिळालेली मते 29, विजयी
2- राम राजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस- मिळालेली मते 28, विजयी
3- आमशा पाडवी- शिवसेना, मिळालेली मते 26, विजयी
4- सचिन अहिर-शिवसेना, मिळालेली मते 26, विजयी
5- भाई जगताप- काँग्रेस, मिळालेली मते 26, विजयी
6- चंद्रकांत हांडोरे- काँग्रेस, मिळालेली मते 22, पराभुत
भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड यांचा भाजपकडे एकही मत नसताना विजयी
भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकही मतं नसताना या जागेची सगळी मदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती.
त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त सरस कामगिरी बजावली असून या अपक्षांची मते खेचली. प्रसाद लाड यांना विजयासाठी आवश्यक असलेला 28 च्या कोट्याची गणित अचूकपणे जमवले.
काँग्रेसच्या मतांची झाली वजाबाकी
काँग्रेसकडे त्यांच्या हक्काचे चौरेचाळीस मते होती. त्यानुसार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची 25 मते मिळणे अपेक्षित होते. परंतु त्यांना बावीस मते पडली.
याचा अर्थ त्यांचे तीन मते फुटली. पहिल्या पसंतीत एकोणवीस मते मिळालेले भाई जगताप दुसऱ्या पसंतीत विजय झाले.
राष्ट्रवादीचा मतांचा झाला गुणाकार
राष्ट्रवादी कडे त्यांची हक्काची मते 51 होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना 57 मते मिळाली. यावर एकनाथ खडसे यांनी म्हटले की भाजपची मते मिळाली. मग सहा मते कुठून आली माहित नाही.
Share your comments