1. इतर बातम्या

ही माहिती असणे गरजेचे! तलाठीला कोणते अधिकार असतात? कोणते नसतात? वाचा सविस्तर

भारताच्या विकासाचा कणा आणि शान हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागाच्या विकासावर संपूर्ण भारताचा विकास अवलंबून आहे.आता आपल्याला माहित आहेच कि ग्रामीण भागाच्या विकासामध्येशेती क्षेत्राचे फार मोठे योगदान असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
important right of talathi about revenue and resposibility of talathi

important right of talathi about revenue and resposibility of talathi

भारताच्या विकासाचा कणा आणि शान हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागाच्या विकासावर संपूर्ण भारताचा विकास अवलंबून आहे.आता आपल्याला माहित आहेच कि ग्रामीण भागाच्या विकासामध्येशेती क्षेत्राचे फार मोठे योगदान असते.

या शेती शी संबंधित सगळ्या प्रकारचे प्रशासकीय काम तलाठी यांच्यामार्फत पार पाडले जाते. कारण ग्रामीण भागातील माणसाचे जास्तीत जास्त प्रशासकीय काम येत असेल तर ते ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालययेथे.गावाचा महसूल गोळा करण्याचे काम तलाठी कडे असते. त्यामुळे ग्रामीण भागाशी निगडित असणाऱ्या तलाठी ला कोणते अधिकार असतात आणि कोणत्या नसतात? हे माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे. या लेखात आपण तलाठ्यांना असलेले अधिकार व नसलेले अधिकारी या बद्दल माहिती घेऊ.

 तलाठ्यांना असलेले अधिकार

1- शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सर्व प्रकारचे उतारे व दाखले देण्याची जबाबदारी तलाठ्याची आहे.

2- तसेच वारस रजिस्टरमध्ये वारसांची नोंद करणे व वारसा मंजूर झाल्यानंतर त्यांची नोंद फेरफार पुस्तकात करणे ही सुद्धा जबाबदारी तलाठ्याची आहे.

3-तसेच पीक पाहणी ची नोंद करणे, मालक स्वतः जमीन कसत असेल तर खुद्द अशी  नोंद करणे, अन्य व्यक्ती जमीन कसत असेल तर वहिवाट सदरी सदर व्यक्तीची नोंद करण्यासाठी फार्म नंबर 14 भरून तहसीलदारांकडे पाठवणे.

4- फेरफार पुस्तकामध्ये खरेदीखताची नोंद करणे.

5- जमीन वाटपाचा आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतरत्या आदेशाची अंमलबजावणी करून वाटपा नुसार वेगवेगळे सातबारे करणे.

6- गावातील जमीन महसुलाची वसुली करणे.

7-शासनाकडून नेमून दिलेली कामे उदा.नुकसानीचे पंचनामे, तगाईचे वाटप, न्यायालयाच्या हुकुमाची अंमलबजावणी तसेच निवडणुका चे काम इत्यादी कामे पूर्ण करणे.

8- जमिनी मध्ये असलेली विहीर, बोरवेल तसेच फळझाडे, इकदार याची नोंद  सातबारावर करणे.

  तलाठ्यांना हे अधिकार नाहीत

1- तलाठ्यांना खाते फोडीचा अधिकार नसून जमीन महसूल अधिनियमानुसार कलम 85 अन्वये तसे अधिकार फक्त तहसिलदारांकडे आहेत. तहसीलदारांनी दिलेल्या खातेफोडीच्या आदेशाची अंमलबजावणी तलाठ्यास  करायची असते.

2- जर तलाठ्याला सातबार्यावर कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर तो फेरफार नोंदी द्वारेच करणे तलाठ्यावर बंधनकारक आहे.

3- फेरफार नोंद मंजूर करण्याचा अधिकार तलाठ्याला नाही, तो अधिकार मंडळाधिकारी यांना आहे.

4- कोणत्याही मंजूर अगर रद्द केलेल्या नोंदीत फेरबदल करण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.

5- पिक पाहणी सदरी मूळ मालकाशिवाय इतर व्यक्तीचे नाव लावण्याचा अधिकार तलाठ्यास नाही. इतर व्यक्तीची वहिवाट आढळल्यास तलाठ्याने फॉर्म नंबर 14 भरून तहसीलदारांकडे पाठवावी व त्यानंतर तहसीलदार त्याबाबत निर्णय घेतात.

6- तसेच नवीन शर्तीची जमीन विक्री करायला परवानगी तलाठी देऊ शकत नाही, तसा अधिकार त्यांना नाही.

7-सातबारावर कुठल्याही प्रकारचा शेरा कमी करण्याचा अधिकार तलाठ्याला नसतो.आणेवारी लावण्याचा अधिकार तलाठ्यास नसून तहसीलदारांना आहे.

स्त्रोत-News 18लोकमत)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:पशुपालकांना हे माहीत असणे गरजेचेच! या 'वनौषधी' वाढवितात जनावरांमधील प्रजननक्षमता

नक्की वाचा:दोडका लावा खूप पैसा कमवा! लागवडीनंतर 60 ते 75 दिवसात अपेक्षेपेक्षा कमवाल जास्त पैसा

नक्की वाचा:एकदा लागवड करा 25 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळवा! मे- जून महिन्यात करा लागवड, एका एकरात वर्षात कमवा 10 लाख उत्पन्न

English Summary: important right of talathi about revenue and resposibility of talathi Published on: 16 May 2022, 10:59 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters