1. इतर बातम्या

ई-श्रम योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास अर्ज करताना या चुका टाळा

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. गरिबांचे जीवनमान उंचावणे हा त्याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत गरीब मजुरांना मासिक भत्ता, 2 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण आणि इतर अनेक फायदे मिळतात.जर तुम्हीही ई-श्रम कार्ड बनवले असेल किंवा अर्ज केला असेल किंवा या योजनेअंतर्गत कार्ड बनवणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. अर्ज करताना तुमची काही चूक झाली असेल तर तुमची नोंदणी रद्द होऊ शकते. तुमचे कार्ड देखील रद्द केले जाऊ शकते.

किरण भेकणे
किरण भेकणे
job

आपली संपूर्ण आणि योग्य माहिती भरा:

ई-श्रम कार्डसाठी अर्ज करताना काही लोक अशा चुका करतात की त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. जर तुम्ही अर्जाच्या वेळी संपूर्ण माहिती दिली नसेल किंवा माहिती दडवली असेल, तर तुमचे कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे ई-श्रम कार्डसाठी अर्ज करताना तुमची संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा. यामध्ये चूक करू नका. सर्व माहिती भरल्यानंतर, ती पुन्हा तपासण्याची खात्री करा.

केवायसी देखील आवश्यक आहे:

ई-श्रम कार्डसाठी बँक खाते असणे आणि केवायसी असणे आवश्यक आहे. जर तुमच्या बँक खात्यात KYC केले नसेल तर ते नक्की करा. तुमचे खाते असलेल्या बँकेत जाऊन तुम्ही सहज केवायसी करू शकता. त्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डची छायाप्रत बँकेत द्यावी लागेल. याशिवाय, मोबाईल क्रमांक खात्याशी जोडावा लागेल जेणेकरून योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. असे न केल्यास बँक खात्यात हप्ता येणार नाही.

या योजनेतील पात्र लोकांच्या बँक खात्यावर भत्त्याचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. ज्यांनी संपूर्ण माहिती दिली नाही त्यांना त्यांच्या खात्यात दुसरा हप्ता मिळणार नाही. ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 कोटींहून अधिक कामगार कार्ड बनवण्यात आले आहेत.या सर्व अटी पाळूनच अर्ज करा

English Summary: If you want to avail the benefits of e-Shram Yojana, avoid these mistakes while applying Published on: 21 April 2022, 09:09 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters