
farmer producer company
कृषी विभागाच्या आत्मा योजना अंतर्गत बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत की ज्या योजनांचा जर फायदा घेतला तर शेतकऱ्यांना बराच प्रकारचे फायदे होऊ शकतात. या आत्मा योजना अंतर्गत अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या सगळे आवश्यक गोष्टी जसे की बियाणी, शेतीसाठी लागणारी खते,कर्जाचा पुरवठा तसेच विमा व सामुहिक शेती करून शेतीत पिकलेल्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे हा उत्पादक कंपनी स्थापनेमागचा महत्त्वाचा हेतू आहे.तरुण बेरोजगार तरुणांना शेतीपुरक उद्योग स्थापन करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.
शेती उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी आवश्यक पात्रता
- एका कंपनीची स्थापना करायची असेल तर कमीतकमी दहा शेतकरी असणे आवश्यक असते.
- दोन वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या ही सोबत घेऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापन करू शकतात.
कंपनीची नोंदणी कशी करावी?
- कंपनीचे नोंदणी ही संधी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी अथवा वकिलांमार्फत करावी लागते.
- जर संबंधित कंपनीमध्ये महिला शेतकर्यांचा सहभाग जास्त असेल तर शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रमाणात घेता येतो.
- कंपनी स्थापनेचा प्रस्ताव सीए सनदी लेखापाल यांच्यामार्फत मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याकडे वर्ग होतात आणि त्यानंतर कंपनी स्थापन करण्याची म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ इन्कॉपोरेशन चे परवानगी पत्र हे आठ दिवसांमध्ये दिले जाते.
- संबंधित माहिती कृषी अधिकारी जुबेर पठाण यांनी दिली असून ते बीड येथील कृषी विभागाच्या आत्मा विभागात कार्यरत आहेत.
कंपनी स्थापन करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट
- कंपनीच्या डायरेक्टर चे लाईट बिल
- दहा शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाईल नंबर
( संदर्भ- हॅलो कृषी )
Share your comments