मुंबई- गांजाची शेती करण्यास परवानगी मागणारे शेतकऱ्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गांजा लागवडीस कायद्याने परवानगी नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर पोलीस कारवाईत गांजा जप्तीच्या बातम्या समोर येतात. व्यसनासाठी छुप्या पद्दतीने कोट्यावधी रुपयांची गांजाची तस्करी केली जाते. जगात अनेक राष्ट्रात वैद्यकीय उपयुक्तता म्हणून गांजा लागवडीस सशर्त मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याने मागणी केल्यानंतर पुन्हा गांजा लागवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गांजा पिकाचा इतिहास ते वैद्यकीय उपयुक्तता याविषयी जाणून घेऊया-
औषध ते तस्करी:
आयुर्वेदिक शास्त्रात गांजा वनस्पतीला औषधाचे स्थान आहे. जेव्हा सुंगणीचे अत्याधुनिक तंत्र उपलब्ध नव्हते. तेव्हा शस्त्रक्रियेदरम्यान गांजाचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.
गांजाच्या वैद्यकीय उपयुक्ततेपेक्षा अंमली पदार्थ म्हणून अधिक वापर केला जातो. गांजा मध्ये मिसळण्यात येणारी तंबाखु कर्करोगाचे कारण ठरते. गांजावर कायद्याने बंदी असल्यामुळे छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. दहा हजार रुपये प्रति किलो एवढ्या प्रमाणात गांजा महाग आहे.
लागवडीच्या दृष्टीने विचार केल्यास गांजाची लागवड सहज केली जाऊ शकते. या झाडांना वाढण्यासाठी कोणत्याही औषध वा फवारणीची नव्हे तर केवळ पाण्याची गरज असते.
Share your comments