विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने रिलायंस हेल्थ सुपर टॉपअप विमा पॉलिसी सादर केली आहे. या पॉलिसीचा मुख्य हेतू आहे की वैद्यकीय खर्च स्टॅंडर्ड संरक्षण पेक्षा जेव्हा जास्त होतो आणि ग्राहकांच्या खिशातून होणारा खर्च वाढतो तेव्हा अशा परिस्थितीत उद्भवणारे अपुऱ्या आरोग्य सेवा संरक्षणाची समस्या हाताळणे हा या पॉलिसीचा हेतू आहे.
या पॉलिसी चे वैशिष्ट्ये
- ग्राहकांच्या गरजेनुसार या पॉलिसीची रचना करण्यात आली आहे.
- 18 ते 65 या वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते.
- या पॉलिसी अंतर्गत जगभरात कव्हरेज मिळणार आहे.
- या पॉलिसी च्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत एअर ऍम्ब्युलन्स चा कव्हर समाविष्ट करण्यात आला आहे.
- या पॉलिसी अंतर्गत दोन लाखांपर्यंत मॅटर्निटी आणि कन्सुमेबल वस्तू मिळतात.
- या पॉलिसी अंतर्गत अवयव दात्याच्या खर्चापासून ते आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया सारखे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणारी उपचार पॉलिसीच्या रकमेवर मर्यादा न येता पॉलिसी सुलभपणे घेता येते.
- रिलायंस हेल्थ सुपर टॉप अप पाच लाखांपासून ते 1.3 कोटींपर्यंत विमा संरक्षण देते.
- ही पॉलिसी ग्राहकांना साध्या हॉस्पिटलाईझशन च्या गरजा पुरवण्यासाठी ही अपुऱ्या असलेल्या त्यांच्या कमी संरक्षण असलेल्या विमा पॉलिसिना टॉप करण्यासाठी ही पॉलिसी आर्थिक दिलासा देते
- सध्या आरोग्य विमा नसलेले ग्राहकही हा सुपर टॉप अप प्लॅन निवडू शकतात तसेच पॉलिसीमध्ये निवड केल्यानुसार त्यांच्या स्वतःच्या खिशातून वजा योग्य रक्कम देऊ शकतात.
- वजा योग्य रकमेचे दोन लाखांपासून ते तीस लाखापर्यंत पर्याय उपलब्ध आहेत.
- रिलायंस हेल्थ सुपर टॉप अप पॉलिसी व्यक्तीकडून किंवा फॅमिली फ्लोटर च्या आधारे एक, दोन किंवा तीन वर्षाच्या कालावधीसाठी घेता येऊ शकते.
- या पॉलिसी मध्ये चार दावा मुक्त वर्षानंतर वजा योग्य रक्कम हटविण्याचा आणि सुपर टॉप अप पॉलिसी स्टॅंडर्ड आरोग्य विमा पॉलिसी मध्ये परिवर्तीत करण्याचा पर्याय मिळतो. व त्यासोबतच बाय बॅक फीचर ही मिळते.
- प्रथम खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या पॉलिसीमध्ये खास सवलत देण्यात येते.
Share your comments