एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित व्हावे यासाठी एक योजना तयार केली असून ग्रामीण आणि निमशहरी भागात 1000 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचा या बँकेचा प्लान आहे.
एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रामीण भागात शाखा उघडण्याचा प्लान करत आहे. आपल्याला माहित आहेच कि एचडीएफसी बँक ही खाजगी बँका असून एचडीएफसी या बँकेत विलीन होणार आहे. एचडीएफसी बँक गृहकर्ज देते. याबाबत एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, आतापर्यंत ग्रामीण बँकिंग त्यांच्या किरकोळ शाखा बँकिंग चा एक भाग होता.
आता तो वेगळा उभा केला आहे. अनिल भवनानी हे या भागाचे प्रमुख असतील.गेला एकोणविस वर्षापासुन ते एचडीएफसी बँकेत काम करीत आहेत.गेल्या मागील काही काळापासून अनेक बँका आणि वित्तीय संस्था ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करत आहे. अगोदर खाजगी बँकांचा ग्रामीण भाग आणि व्यवसाय बाबत असलेला दृष्टिकोन आता बदलला आहे. खाजगी बँकांवर कायम शहरी भागावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप होत आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांचे उपस्थिती वाढवण्यासाठी सरकारने काही नियम केले होते.
त्या अनुषंगाने ॲक्सिस बँकेने गेल्या वर्षी भारत बँकिंग उपक्रम सुरू केला होता.त्याचाही उद्देश ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे हा होता.ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागात बँकांपेक्षा सूक्ष्म वित्तसंस्थांच्या जास्त पोहोच असून सहभाग देखील मोठा आहे.
ग्रामीण भागातील लोकांना त्यांचे काम सुलभतेने सुरू करता यावे म्हणून अल्प प्रमाणात कर्ज देतात. याबाबत एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, भविष्यातील गरज लक्षात घेऊन ते आपली रणनीती बनवत आहे. भारताच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही ज्या ठिकाणी बँकाच्या सेवांचा अभाव आहे अशा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आमच्यासाठी हे आव्हान आणि संधी असे दोन्ही आहेत असे भावनानी म्हणाल्या.
ग्रामीण भागातआणि निमशहरी भागात नवीन बँकेच्या शाखा सुरू करण्याच्या कामावर ते स्वतः देखरेख करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एचडीएफसी बँकेने या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात 1064 नवीन शाखा उघडणार असल्याचे सांगितले आहे. सध्या एचडीएफसी बँकेच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात 50% शाखा आहेत.
ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आनंद यांच्याशी करार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments