कुटुंबासाठी असणारी धडपडी वृत्ती, अपरिमित कष्ट करणारे, मुलांसाठी हवा तितका खर्च करून स्वतः साधेपणात समाधानी राहणारा, आयुष्यभराची पुंजी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी साठवून ठेवणारा दुसरं कोण असणार ... बाबाच. त्या दोन अक्षरी शब्दातसुद्धा कितीतरी तरी मायेचा ओलावा दडला आहे. आई आणि वडील हे कुटुंबातील एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कर्तव्य वेगवेगळी असली तरी ध्येय मात्र एकच. आपल्या कुटुंबासाठी दोघेही तितकेच कष्ट घेत असतात.
खरंतर मुलावर वडील म्हणून जेंव्हा जबाबदारी पडते. तेंव्हापासूनच स्वतःसाठी जगणं ते विसरूनच जातात. त्यांचं सर्वकाही त्यांचं कुटुंब बनून जाते. प्रत्येक गोष्टीत सगळ्यात आधी स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबाचाच विचार करणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. वडील नसतानाचे आयुष्य म्हणजे तारेवरची कसरतच. आजचा दिवस तसा खासच. आज १९ जून. १९ जून हा दिवस फादर्स डे म्हणून जगभरात साजरा केला जातो.
जाणून घेऊया फादर्स डे चा इतिहास
वॉशिंग्टनमधील स्पोकेन शहरात सोनोरा डॉड यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत या खास दिवसाची सुरुवात केली होती. सोनोरा यांची आई फारच लवकर त्यांना सोडून गेली. त्यानंतर मात्र तिने वडिलांसोबत आपल्या भावंडांचे संगोपन केले. तिला वडिलांबद्दल बराच आदर होता. प्रेम होते. ५ जून ला तिच्या वडिलांचा वाढदिवस असतो.
म्हणून तिची ५ जून हा 'फादर्स डे' म्हणून ओळखला जावा अशी इच्छा होती. तिने स्पोकेन मंत्रिमंडळाशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी हा खास दिवस महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला.आणि अशाप्रकारे १९ जून हा फादर्स डे म्हणून जगभरात साजरा होऊ लागला.
अनेक भागात फादर्स डे निमित्त सुट्टी असते. मात्र भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही. तुम्ही मात्र आपल्या वडिलांना शुभेच्छा किंवा भेटवस्तू देण्याऐवजी, तुमचा थोडा वेळ देऊन बघा. त्यांचा हा दिवस नक्कीच खास बनेल. त्यांच्यासाठी तुमचा थोडा वेळच पुरेसा असेल. कोरोना परिस्थितीतून आपण एक गोष्ट मात्र नक्कीच शिकू शकतो की, कोणत्याही गोष्टीपेक्षा एकमेकांना साथ देणं, वेळ देणं हेच महत्वाचं आहे.
कोरोनाकाळात कितीतरी लेकरं पोरकी झाली. त्यांची उणीव कुणीही भरून नाही काढू शकणार. त्यामुळे आपल्या वडिलांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ नक्कीच द्या आणि आजचा हा दिवस खास बनवा. कृषी जागरण परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना पितृदिनाच्या खूप शुभेच्छा.
महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! स्वत:च्या लग्नाला आमदार गैरहजर, गुन्हा दाखल; म्हणाले, मला लग्नाबद्दल कुणी सांगितलंच नाही..
'आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील'
Share your comments