1. इतर बातम्या

एकदाच वाचाच..! ग्रामसभा नियम व अटी

प्रत्येक गावातील ग्रामसभा (Gram Sabha) ही गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील 'लोकसभा' असते. ग्रामपंचायतीच्या कारभारात गावातील ग्रामस्थांचा सहभाग असेलेले गावातील लोकांचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.

ग्रामसभा नियम व अटी

ग्रामसभा नियम व अटी

प्रत्येक गावातील ग्रामसभा (Gram Sabha) ही गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील 'लोकसभा' असते. ग्रामपंचायतीच्या कारभारात गावातील ग्रामस्थांचा सहभाग असेलेले गावातील लोकांचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या ग्रामसभेबाबत तरतुदी

• प्रत्येक आर्थिकवर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) निदान सहा ग्रामसभा ग्रामपंचायतीस घेण्यास बंधनकारक आहे.

• एका आर्थिक वर्षात सरपंच सहा ग्रामसभापैकी एकही ग्रामसभा घेण्यास चुकल्यास, त्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन, निलंबनास पात्र असेल.

• पहिली ग्रामसभा त्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे आवश्यक आहे.

• ग्रामसभेच्या दोन सभा दरम्यान चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये.

• ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील.

• ग्रामसभेचे पदसिध्द अध्यक्ष सरपंच हे असतील. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असेल. या दोघांच्या अनुउपस्थितीत ग्रामसभेत उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून निवडलेली एखादी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील.

• ग्रामसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष यांनी किंवा ते ज्यांना आदेशीत करतील त्यांनीं देणे बंधनकारक आहे.

मोठी बातमी: ...तर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे पद रद्द होणार

• ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रिकरण करणे, फोटो काढणे आवश्यक आहे. (शासन परिपत्रकानुसार).

• स्थायी समिती, पंचायत समिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी तसचे राज्यशासन यांच्याद्वारे फर्मावलेली कोणतेही कार्य ग्रामसभा पार पाडील.

• ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा ग्रामसभेच्या नियमित सभेपूर्वी घेण्यात यावी.

• ग्रामसभेसाठी मतदारांची उपस्थिती तसेच, महिलांची उपस्थिती वाढवण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी ग्रामपंचायतीने खबरदारी घ्यावी.

• सरपंचाला स्वतःहोऊन कोणत्याही वेळी ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार असेल.

• स्थायी समिती, पंचायत समितीने किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने किंवा राज्य शासनाने ग्रामसभेची मागणी केल्यावर सरपंचास पंधरा दिवसाच्या आत ग्रामसभा बोलावणे अनिवार्य असेल.

• ग्रामसभा, तिच्या पुढील सभेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण तिच्या आगोदरच्या सभेत निश्चित करेल.

• ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी तसेच, गावात काम करणारे शासकीय, निम-शासकीय आणि पंचायतीचे सर्व कर्मचारी ग्रामसभेच्या सभांना हजर राहणे आवश्यक आहे.

• ग्रामस्तरावरील कर्मचारी व अधिकारी जसे की तलाठी, कृषी सहाय्यक, वनपाल, शिक्षक, वायरमन, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक इत्यादींनी ग्रामसभेत उपस्थित राहून त्यांच्या कामाचा आढावा ग्रामसभेस देणे त्यांना बंधनकारक आहे.

• ग्रामसभेस किमान १०० किंवा एकूण मतदारांच्या १५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्ती संख्या समजण्यात येईल.

• ग्रासभेचे कार्यवृत्त (विवरण), ग्रामपंचायतीचा संबंधित सचिव (ग्रामसेवक) तयार करील. किंवा त्याच्या अनुउपस्थित सरपंच निदेश देईल त्याप्रमाणे, ग्रामपंचायतीचा कर्मचारी तयार करील.

• ग्रामपंचायत प्रत्येक सहामाहीमध्ये एकदा, विकासकामांवर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेत ठेवील व त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावील.

शेतकऱ्यांनो बोंडअळीची चिंता सोडा, बोंडअळी वर नंदुरबार पॅटर्न यशस्वी; राज्यभर चर्चा

ग्रामसभेची पूर्वतयारी

१. ग्राम सभेची नोटीस ही लेखी स्वरूपात किमान ७ दिवस देणे आवश्यक आहे.

२. ग्रामसभेचा प्रचार प्रसिद्धी दवंडीद्वारे व गावातील सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावून करण्यात यावी. तसेच, मोबाईल एस.एम.एस द्वारे प्रसिद्धी करावी.

३. ग्रामसभेची सूचना, नोटीस गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना दिली पाहिजे.

४. ग्रामसभेमध्ये ऐन वेळी घ्यावयाचे विषय लेखी स्वरूपात ग्रामसभेच्या तारखेपूर्वी दोन दिवस अगोदर सरपंच/ग्रामसेवाकडे देणे आवश्यक असते.

५. प्रत्येक ग्रामसभेपुर्वी सदस्यांनी आपापल्या वार्डात वार्डसभा घेणे बंधनकारक आहे.

पगाराशिवाय रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, याबाबत EPFO स्पष्टच सांगितले..

English Summary: Gram Sabha Rules and Conditions Published on: 23 October 2022, 11:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters