1. इतर बातम्या

गुगल पे आणि फोन पे देतय तुम्हाला कर्ज, आता कर्ज मिळवण्यासाठी नो टेन्शन

अनेक जण आपले आर्थिक चणचण असल्यामुळे बँकेकडे कर्ज काढण्यासाठी धाव घेतात मात्र त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गुगल पे आणि फोन पे देतय तुम्हाला कर्ज, आता कर्ज मिळवण्यासाठी नो टेन्शन

गुगल पे आणि फोन पे देतय तुम्हाला कर्ज, आता कर्ज मिळवण्यासाठी नो टेन्शन

अनेक जण आपले आर्थिक चणचण असल्यामुळे बँकेकडे कर्ज काढण्यासाठी धाव घेतात मात्र त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागते तरीसुद्धा बँकेतून कर्ज भेटत नाही. त्यामुळे हा आजचा लेख तुमच्यासाठीच आहे. लोन मिळत नसेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही कारण गुगल पे आणि फोन पे या दोन ॲपच्या माध्यमातून आपल्याला कर्ज मिळवणे झाले अगदी सोपे.

 कारण आता एक छोटीशी गोष्ट करताच तुम्हाला मोठे लोन मिळणार आहे. तुम्हीही गुगल पे किंवा फोन पे वापरत असाल तर तुम्हीही नक्कीच आरामात कर्ज घेऊ शकता. 1 लाख रुपयांपर्यंत सगळ्यांना कर्ज उपलब्ध आहे.

कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत, गुगल पे तसेच फोन पे वरून ताबडतोब कर्ज घेतले जाऊ शकते.

गुगल पे ने DMI Finance Limited सह भागीदारी केली आहे. या भागीदारीत दोन्ही कंपन्या संयुक्तपणे डिजिटल पर्सनल लोनbऑफर करत आहेत. जर एखाद्या ग्राहकाला फोन पे कडून कर्ज घ्यायचे असेल, तर त्याला त्याच्या मूळ कंपनी फ्लिपकार्ट कडून कर्ज मंजूर करावे लागेल. यासोबतच ग्राहकाचा CIBIL स्कोर 700/750 च्या वर असावा आणि त्यासोबत तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील असायला हवे.

गुगल पे ची प्रोसेस

गुगल पे उघडून त्यातील लोनचा पर्याय निवडा.

आता आपल्यासमोर विविध प्रकारच्या कर्जाच्या ऑफर येतील, त्यापैकी प्री अप्रुव्ह कर्जाचा पर्याय निवडून कर्जाची रक्कम आणि परतफेडीची वेळ निवडा.कर्ज घेण्यासाठी चार्ज पर्यायावर क्लिक करामोबाइलवर आलेला ओटीपी टाकताच तुमच्या कर्जाची पुष्टी अॅपद्वारे केली जाईल.

फोन पे ची प्रोसेस

फोन पे वर Flipkart Pay Later पर्याय निवडून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे येथे विचारली जातील.

मग फ्लिपकार्ट पे नंतर खाते तयार करावे लागेल. तुमचा CIBIL स्कोर 750 च्या वर असल्यास, तुम्हाला कर्ज सहज मिळेल.

एकदा My Money या पर्यायावर क्लिक करा. कर्जाची रक्कम तुमच्या UPI खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

English Summary: Google Pay and Phone Pay give you a loan, now no tension to get a loan Published on: 15 April 2022, 08:51 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters