Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धापासून बाजारात ही अस्थिरता निर्माण झाली आहे. देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. या सणासुदीच्या काळात अनेकजण सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) दागिने खरेदी करत असतात.
आंतरराष्ट्रीय किमतीत घसरण झाल्यामुळे गुरुवारी भारतातील सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.25 टक्क्यांनी घसरून 49,321 रुपयांवर आले. सोन्याचा दर सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
तर चांदी 0.4 टक्क्यांनी घसरून 57,059 रुपये प्रति किलोवर आहे. जागतिक बाजारात, स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव एक टक्क्याने घसरून $1,656.97 प्रति औंस झाला आहे.
IBJA वर सोने आणि चांदीची स्थिती
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यापार आठवड्याच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी (22 सप्टेंबर) सोने 48 रुपये प्रति दहा ग्रॅम महाग झाले आणि 49654 रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडले. तर बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने प्रति दहा ग्रॅम 238 रुपयांनी महागले आणि प्रति 10 ग्रॅम 49606 रुपयांवर बंद झाले.
दुसरीकडे, आज चांदी 97 रुपये प्रति किलो दराने महाग झाली आणि 56764 रुपये प्रति किलोवर उघडली. तर बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 313 रुपयांनी महागली आणि 56667 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
हातातोंडाला आलेल्या सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांचा सरकारवर आरोप
सोने 6500 आणि चांदी 23200 पर्यंत स्वस्त होत आहे
या घसरणीनंतर, सोन्याचा दर सध्या 6546 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 23216 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे. अशा परिस्थितीत, जे सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही खरेदीची चांगली संधी ठरू शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची स्थिती
भारतीय सराफा बाजाराच्या (Indian Bullion Market) विपरीत, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी घसरणीसह व्यवहार करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव $7.26 नी घसरून $1,659.27 प्रति औंसवर होत आहे. दुसरीकडे, चांदी 0.10 डॉलरने घसरून $19.36 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.
पशुपालकांनो सावधान! लम्पीचं नाही तर या 5 रोगांमुळे दुभत्या जनावरांचा होऊ शकतो मृत्यू
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव
दिल्ली- 22 कॅरेट सोने : रु. 46150, 24 कॅरेट सोने : रु. 50350, चांदीची किंमत : रु. 57200
मुंबई- 22 कॅरेट सोने : रु. 46000, 24 कॅरेट सोने : रु. 50200, चांदीची किंमत : रु. 57200
कोलकाता- 22 कॅरेट सोने : रु. 46000, 24 कॅरेट सोने : रु. 50200, चांदीची किंमत : रु. 57200
चेन्नई- 22 कॅरेट सोने : रु. 46400, 24 कॅरेट सोने : रु. 50620, चांदीची किंमत : रु. 62400
हैदराबाद- 22 कॅरेट सोने : रु. 46000, 24 कॅरेट सोने : रु. 50200, चांदीची किंमत : रु. 62400
बंगलोर- 22 कॅरेट सोने : रु. 46050, 24 कॅरेट सोने : रु. 50240, चांदीची किंमत : रु. 62400
महत्वाच्या बातम्या:
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! निर्णय झाला, या दराने मिळणार DA
Buffalo Farming: महाराष्ट्रातील ही म्हशीची जात देतेय 1005 लिटर दूध; जाणून घ्या खासियत
Share your comments