1. इतर बातम्या

Gold Price: दागिने आता महागणार! सोने चांदीच्या दरात वाढ; जाऊन घ्या दर

Gold Price

Gold Price

Gold Price : सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ होत आहे. यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव 58,000 च्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 56,000 च्या पातळीवर होता. फेब्रुवारीपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत जोरदार बदल होत आहेत. जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात वाढ होत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे.

सोने-चांदी महागले

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 400 रुपयांनी वाढून 58,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, गेल्या व्यापार सत्रात सोने 57,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. मात्र, चांदीचा भाव 430 रुपयांनी घसरून 67,600 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काय आहे?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, दिल्ली बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 400 रुपयांनी वाढून 58,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,928 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदी घसरून 21.87 डॉलर प्रति औंस झाली. शुक्रवारी, आशियाई व्यापाराच्या तासांमध्ये, कॉमेक्समध्ये सोन्याचे भाव वाढत होते.

अवकाळीच्या नुकसानीची माहिती 'या' नंबरवर पाठवा, मिळणार मदत : कृषिमंत्री

सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. 'बीआयएस केअर अॅप'द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

दर तपासा

तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.

English Summary: Gold Price: Jewelry will be expensive now! Increase in gold and silver rates Published on: 18 March 2023, 03:30 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters