सोने खरेदी करण्याची सगळ्यांची इच्छा असते. परंतु बऱ्याचदा सोन्याच्या वाढत्या भावामुळे प्रत्येकाला ते शक्य होत नाही. अशा व्यक्तींसाठी एक महत्वाची बातमी असून, आता सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 'सार्वभौम सुवर्ण रोखे'योजनेत जून महिन्यानंतर पुन्हा गुंतवणूक करण्याची संधी मिळाली असून रिझर्व बँक ऑफ इंडियाने ही योजना आणली आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून 26 ऑगस्टपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
नक्की वाचा:Gold Price Update: खुशखबर! सोन्या चांदीच्या दरात घसरण; चांदी 1219 रुपयांनी घसरली...
या योजनेचा पहिला टप्पा हा रिझर्व बँकेने 20 जून ते 24 जून दरम्यान सुरू केला होता. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारने सोन्याचा दर निश्चित केला असून त्यानुसार सोन्याची किंमत पाच हजार 197 रुपये प्रति ग्राम जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जास्त सोने खरेदी करण्याची गरज नसून अवघे एक ग्राम सोने खरेदी करून देखील तुम्हाला सहभागी होता येणार आहे.
याअंतर्गत सोने खरेदीचे नियम
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजेया योजनेच्या अंतर्गत सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नसून फक्त सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते.या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्ही एका आर्थिक वर्षात एक ग्रॅम ते चार किलो पर्यंतच्या सोने खरेदी करू शकता व संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते.
आपण परताव्याचा विचार केला तर यावरील परतावा देखील उत्तम मिळतो व या बॉण्डचा एकूण कालावधी आठ वर्षांचा आहे परंतु जर गुंतवणूकदारांची या बॉण्डमधून बाहेर निघण्याची इच्छा असेल तर ते पाचव्या वर्षानंतर बाहेर निघू शकतात.
Share your comments