1. इतर बातम्या

Gold Rate Update: सोने व चांदीच्या दरात वाढ, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 700 रुपयांची वाढ, वाचा भाव

काही दिवसांपासून नीचांकी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जर आपण बुधवारी सोन्या-चांदीच्या मार्केटचा विचार केला तर यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या संकेतस्थळानुसार, सराफा बाजारांमध्ये सोने 86 रुपयांनी महाग होऊन 52147 रुपये झाले तर फ्युचर्स मार्केटचा विचार केला तर एमसीएक्स वर 14 रुपयांची वाढ होऊन सोने 51 हजार 840 रुपयांवर व्यवहार करत होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gold and silver rate

नक्की वाचा:Gold Price Today: आनंदाची बातमी! सोन्या चांदीचे दर घसरले; सोने मिळतंय तब्बल 4100 रुपयांनी स्वस्त...

 या महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल सातशे रुपयांनी वाढ

 जर आपण ऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरुवातीचा विचार केला तर सोन्याचा दर 51405 रुपये प्रति दहा ग्रम होता. परंतु त्यामध्ये आता वाढ होऊन तो 52147 रुपयांवर पोहोचला आहे.

 आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्थिती

 जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोने 1775.19 डॉलर प्रति औंस आणि चांदी 20.08 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

नक्की वाचा:सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! सोने आणि चांदी इतक्या रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर...

 कॅरेटनुसार सोन्याच्या किमती

1- 24 कॅरेट- 52147 रुपये तोळे

2- 23 कॅरेट- 51939 रुपये तोळे

3- 22 कॅरेट- 47 हजार 767 रुपये तोळे

4- 18 कॅरेट- 39 हजार 110 रुपये प्रति तोळा

 घरबसल्या पहा सोन्याचा भाव

8955664433 या नंबर वर मिस कॉल देऊन तुम्ही घर बसल्या सोन्या चांदीचे भाव सहजपणे पाहू शकतात. या नंबर वर अवघा तुम्ही मिस कॉल दिला तरी तुमच्या फोनवर संदेश स्वरूपात तुम्हाला  सोने व चांदीचे नवीन दर कळतात.

नक्की वाचा:दिलासादायक बातमी! खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता,'आयएमसी'ची महत्वपूर्ण बैठक

English Summary: gold and silver rate growth in market and internationl market Published on: 18 August 2022, 12:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters