1. इतर बातम्या

ऑनलाईन मिळवा रेशन कार्डची माहिती ; तक्रार आणि नव्या शिधापत्रिकेसाठी करा अर्ज

राज्य सरकारांकडून आपल्या राज्यातील नागरिकांसाठी अन्नाची पुर्तता व्हावी यासाठी रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका प्रदाने केली आहे. राज्यातील गरीब नागरिाकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त दरात अनुदानित खाद्यपदार्थ पुरवले जातात. काही ठिकाणी ही नागरिकांच्या ओळखीची सामान्य कागदपत्रेही आहेत. सरकारी कामांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

KJ Staff
KJ Staff
ration card information

ration card information

राज्य सरकारांकडून आपल्या राज्यातील नागरिकांसाठी अन्नाची पुर्तता व्हावी यासाठी रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका प्रदाने केली आहे. राज्यातील गरीब नागरिाकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त दरात अनुदानित खाद्यपदार्थ पुरवले जातात. काही ठिकाणी ही नागरिकांच्या ओळखीची सामान्य कागदपत्रेही आहेत. सरकारी कामांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

सध्या देशात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विशेष निर्णय घेण्यात आले आहेत.  या व्हायरसचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  दरम्यान या काळात जनतेला उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आपण एकाच वेळी सहा महिन्याचा धान्य घेऊ शकता, कोणत्याही ठिकाणी आपण आपल्या रेशन कार्डवर अन्नधान्य घेऊ शकता. यासह जनतेला सरकारने सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळावे यासाठीही तरतूद केली आहे. 

आपण आज रेशन कार्ड शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा, काही तक्रार असेल तर ती ऑनलाईनपद्धतीने कशी करायची यासंबंधीची माहिती घेणार आहोत. दरम्यान  ग्रामीण भागात ७६ टक्के लोकांना योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभा जे सांगेल त्याच व्यक्ती सरकार यादीत असतील. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ आपल्या राज्यात कोण-कोणत्या शिधापत्रिका मिळतात. 

रेशनकार्डचे प्रकार

अंत्योदय रेशनकार्ड – अंत्योदय योजनेतील लाभधारक
प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
पांढरे रेशनकार्ड – १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती

हेही वाचा :लग्नानंतर पत्नीचं नाव रेशन कार्डवर दाखल करायचंय ? मग करा 'या' गोष्टी

कोणाला  मिळतो लाभ -

अंत्योदय योजनेतील लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्राधान्याने लाभ दिला जातो. प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो.  तर ४४ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गावातील एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकांना याचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील प्रमाण हे ७६ टक्के आहे तर शहरी भागातील प्रमाण ४५ टक्के आहे. प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू देण्यात येतो. तर ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्याबरोबरच १५ रुपये ८१ पैसे दराने रॉकेल दिले जाते. पांढरे कार्ड व दोन गॅस असलेल्या.

कशी काढणार ऑनलाईन शिधापत्रिका:

रेशनकार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. तर गावागावांत असलेल्या किंवा सर्कलमध्ये असलेल्या महा इ सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. त्याठिकाणी जाऊन वरील कागदपत्रे सादर केल्यास नवीन रेशनकार्ड किंवा नाव कमी करणे आणि वाढवून मिळण्याचे काम होऊ शकते. त्याठिकाणाहून तहसिल कार्यालयात रेशनकार्ड येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबंधितांची सही झाली की रेशनकार्ड तयार होते. रेशनकार्डविषयीच्या माहितीसाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या mahafood.gov.in संकेतस्थळावर जाऊ शकता.

महा इ सेवा केंद्र

महा इ सेवा केंद्र

तक्रार करायची असल्यास काय करणार:

महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी एक चांगली सुविधा करु दिली आहे. आपण घरी बसून आपल्या रेशनकार्डविषयी माहिती जाणून घेण्यासाठी किंवा राज्यातील स्वस्त धान्य दुकानांची नावे ठिकाण जाणून घेण्यासाठी, तक्रार करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. जर आपली काही तक्रार असेल तर आपण ऑनलाईनने तक्रार करू शकता. यासाठी आपल्याला mahafood.gov.in  या संकेतस्थळावर जावे लागेल.  या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला तक्रार निवारण पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होईल. तेथे दिलेल्या क्रमा्ंकावर संपर्क करुन आपण तक्रार देऊ शकता. तेथे आपम वितरण व्यवस्थेशीसंबंधीत तक्रार करु शकता. तक्रार निवारण केंद्र सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालू असते.  १९६७/१८००-२२-४९५० या नि:शुल्क टेलीफोन क्रमांकावर तक्रार नोंदविता येते. सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्रात helpline(dot)mhpds(at)gov(dot)in या ई-मेल द्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नवीन शिधापत्रिका हवी असल्यास -

जर आपल्याला नवीन शिधापत्रिका हवी असेल तर आपण mahafood.gov.in वर जावे. या संकेतस्थळाच्या डाव्या बाजूला नवीन  कार्ड करण्यासाठी एक पर्याय दिला आहे. त्यावर क्लिक करुन आपण अर्ज भरू शकता. यात पर्यायामंध्ये आपण तक्रार, ऑनलाईन रास्तभाव दुकाने, ई-जबाब प्रणाली सारखी पर्याय  दिसतील. यावर क्लिक करुन आपण तक्रारही करु शकता किंवा दुकांनाची माहिती घेऊ शकता.

English Summary: get online ration card information, complaint and new application form Published on: 23 April 2020, 02:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters