
discount offer on vivo smartphone
सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांचे फेस्टिव्ह सीजन सेलला प्रारंभ झाला असून या माध्यमातून अनेक उत्तम दर्जाच्या स्मार्टफोन विविध प्रकारच्या ऑफरमध्ये मिळत आहेत. यामध्ये विवो कंपनी आपल्या टी सिरीज स्मार्टफोनवर देखील विशेष सूट देणार असून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल हा 22 सप्टेंबर पासून सुरू झाला असून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्टवर होणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्तम ऑफरचा लाभ मिळवता येणार आहे.
यामध्ये विवो कंपनीने अलीकडेच विवो T1 5G स्पेशल फेस्टिव्ह एडिशन सेल्फी व्हाईट रंगामध्ये लॉंच केले आहे व यावर फ्लॅट डिस्काउंट काही प्रमाणात कॅशबॅक देखील या डिव्हाइसवर करण्यात येणार आहेत.
वीओच्या या स्मार्टफोनवर मिळत आहे ऑफर
1- विवो T1x- या सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना केवळ एक हजार रुपयांचा डिस्काऊंट कुपनचा लाभ मिळू शकणार आहे.
तसेच यासाठी बँकेच्या ऑफर देखील लागू करण्याची शक्यता असून जर संबंधित ग्राहकाकडे आयसीआयसीआय किंवा ॲक्सिस बँकेचे डेबिट-क्रेडिट कार्ड असेल तर त्यांना पेमेंटदरम्यान एक हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.
2- विवो T1 प्रो- फ्लिपकार्ट चा बिग बिल्लियन डेज सेलच्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रिपेड ऑर्डरवर चार हजार रुपयांचे सुट मिळणार आहे.
याशिवाय कंपनी 5G फोनवर दोन हजार रुपयांची अतिरिक्त शुल्क देखील देत आहे आणि जुना फोन एक्सचेंज केल्यावर त्याची किंमत आणखी कमी होणार आहे. ऑफरच्या माध्यमातून हा फोन 17999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे.
3- विवो T1 44W- या फोनसाठी एक हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणारा असून हा फोन सेलमध्ये 12499 रुपयांना मिळणार आहे. फोनवर आयसीआयसीआय/अॅक्सिस बँक कार्डसह 1 हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त 10 टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे.
4- विवो T1 5G- विवो T1 5Gस्पेशल फेस्टिवल एडिशन आणि इतर व्हेरिएंट फक्त 14999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. यामध्ये आयसीआयसीआय बँक किंवा अॅक्सिस बँक कार्डवर एक हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त 10 टक्के कॅशबॅक लाभ मिळणार आहे.
नक्की वाचा:पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरवर्षी मिळणार 1 लाख 11 हजार रुपये
Share your comments