1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार अशी चिन्हे पाहायला मिळत होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या (Cylinder) किमतीत कपात करण्यात आली असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
आजपासून व्यावसायिक सिलेडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर (Professional cylinders) 2012.50 रुपयांऐवजी 1976.50 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी आता 1936.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबई घरगुती सिलेंडरसाठी 1052 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडर (LPG cylinder) खरेदी केल्यास तुम्हाला 1053 रुपये द्यावे लागतील. याआधी जुलै महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
हे ही वाचा
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
त्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2012.50 रुपये, मुंबईत 1,972.50 रुपये, कोलकात्यात 2,132 रुपये आणि चेन्नईमध्ये 2,177.50 रुपये झाली होती. त्याच वेळी, 6 जुलै रोजी घरगुती एलपीजीच्या किंमतीत 50 रुपये प्रति सिलेंडरने वाढ केली होती.
मे महिन्यापासून एलपीजीच्या (LPG) किमतीतील ही तिसरी वाढ होती. यानंतर दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1,003 रुपयांवरून 1,053 रुपये झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
Onion Rate: कांद्याचे दर वाढले! बाजारपेठेत मिळतोय 'इतका' दर, जाणून घ्या आजचा बाजारभाव
Animal Husbandry: पशुपालकांनो तुमची जनावरे आजारी नाहीत ना? तर 'या' सोप्या मार्गाने ओळखून करा उपचार
Petrol Diesel Rates: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल डिझेलचे नवीन दर; जाणून घ्या आजचे दर
Share your comments