1. बातम्या

Petrol Diesel Rates: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल डिझेलचे नवीन दर; जाणून घ्या आजचे दर

आज दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये आहे तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. आपण इतर शहरांमधीलही दर जाणून घेऊया.

Petrol Diesel Rates

Petrol Diesel Rates

आज दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोल (Petrol Rates) 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये आहे तर डिझेलचा (Diesel Rates) दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. आपल्याला इतर शहरांमधीलही दर माहीत असणे गरजेचे आहे.

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates) जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. अलीकडेच सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात सर्वाधिक 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली आहे.

हे ही वाचा
Monkeypox: 'या' देशात मंकीपॉक्सचा दुसरा बळी; जगभरात आढळले 20 हजारांहून रुग्ण

आपण पाहिले तर सध्या कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL वेबसाइटवरून मिळेल.

नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

हे ही वाचा
Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 'पाच' बदल

या पॅरामीटर्सच्या (parameters) आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्याचे काम करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. कर आणि स्वतःचे मार्जिन जोडून ते ग्राहकांना किरकोळ किमतीत पेट्रोल विकतात. हा खर्च पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही जोडला जातो.

महत्वाच्या बातम्या 
Pension Scheme: शेतकरी मित्रांनो; पत्नीच्या नावाने उघडा 'हे' अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
"या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी"; रूपाली ठोंबरे पाटलांची राज्यपालांवर जहरी टीका

English Summary: Petrol Diesel Rates Oil companies announce rates Published on: 31 July 2022, 04:37 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters