1. इतर बातम्या

नागपंचमीचा जुगार खेळ, शेतकऱ्याने सावकाराला दूध पाजल्या सारखा!

हिंदू संस्कृतीत नागपंचमी सणाला नागाची पुजा करतात

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
नागपंचमीचा जुगार खेळ, शेतकऱ्याने सावकाराला दूध पाजल्या सारखा!

नागपंचमीचा जुगार खेळ, शेतकऱ्याने सावकाराला दूध पाजल्या सारखा!

हिंदू संस्कृतीत नागपंचमी सणाला नागाची पुजा करतात दूध पाजतात सापा सारख्या विषारी प्राण्याला पुजा करून सन्मान देणाऱ्या संस्कृतीतून सिद्ध होते की प्रेम, सद-भावना, ईतर धर्मीयांचा सन्मान व शत्रूला पण एक वेळ प्रेमाने जिंकण्याचा संदेश देणारा असा हिंदू धर्म.जगाचा पोशिंदा शेतकरी शेती मध्ये ऊन, वारा, पाऊस सहन करत रक्ताचे घाम गाळून काळ्या मातीतून मोती रुपी धान्य पिकवून जगाचा पोट

भरणाऱ्या शेतकऱ्याच्या उदारतेचा फायदा घेऊन आर्थिक शोषण करणारे धूर्त कावेबाज राज्यकर्ते, सावकार, व्यापारी रुपी विषारी नाग परोपकार विसरून लचका तोडण्याची कोणतीच संधी वाया जाऊ देत नाही, शेतकऱ्यांच्या कष्टाने मालावर डोळा ठेवून कवडी मोल भावाने शेती उत्पादीत माल मिळावा म्हनून शेतकरी राजाला अडचणीत

आणण्यासाठी स्वार्थी शेतकरी-द्वेष्टे( सावकार व्यापारी) लोकांकडून बळीराजाला गंडविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या,Different tricks from people to fool Baliraja, कट कारस्थान रचण्यात येत आसतात, तळतळत्या उन्हात जमिनीची मशागत करून वादळ वाऱ्याची पर्वा न करता पावसाच्या सरींनी तृप्त झालेल्या काळ्या आईवर एका बियाचे चे हजार करण्यासाठीं पेरणी खत व्यवस्थापन करून

पोटच्या पोरा सारखे पिकाचे जतन करत असताना डौलदार पिक शेतात बहरल्यावर मुलींचं लग्न, मुलांचं शिक्षण, मोडकळीस आलेल्या घराची मरम्मत, भोळ्या शंकराची लंकेची पार्वती फाटका पदर डोक्यावर घेऊन खांद्याला खांदा देवून राब-राब राबणाऱ्या अर्धंगिनी साठी दिवाळीला नवे कपडे, गाडी,बंगला ऐशो आराम चे स्वप्न न पाहता मूलभूत

गरजा भागविण्याचे स्वप्न पाहत असताना त्याच्या स्वप्नांचा चुराडा करण्यासाठी धूर्त लोकांना अनिष्ट प्रथा ची साथ मिळाली आहे, यातूनच एक् म्हणजे नागपंचमीच्या सणाला जुगार खेळणे या प्रथेमुळे कीत्तेक शेतकरी बांधवांच्या जीवावर बेतली तर लाखों शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले, अडत्या, सावकार व बँकेकडून

कर्ज काढून शेतीत डौलदार पिक उभ पाहून आपल्या कष्टाने धरणी मातेच्या कृपेने स्वप्नपूर्ती होईल या मृगजळी स्वप्नांनी सुखावलेला शेतकरी राजा ठणठण गोपाळ झालेला असतो,अशातच प्रथा म्हनून जुगार खेळण्याचा मोह आवरणार नाहीच, पूर्वी पासूनच शेतातील पिक पाहून लाळ गाळणारे सावकार गावा खेड्यात होतेच आजही आहेत ,उभ्या पिकाच्या भरवश्यावर अवाजवी व्याज दराने पैसे दिले जातात तर काही शेतकरी शहारातील अडत्या कडून त्यांच्याच

अडत मध्ये माल विकण्याच्या जबानीवर व्याजाने पैसे घेतात व ज्या सत्यवान पांडवांचा जुगार मुळे घात झाला तीच वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपते,जुगार मध्ये पैसा हरल्यावर,शेतात डोलणारे पिक पाहून सुखावणाऱ्या शेतकऱ्याला तेच डोलणारे पिक आता नागाच्या फण्यासारखे दिसू लागले, मुलीच लग्न, शिक्षण, घराची दुरुस्ती, पत्नीची साडी सारख्या रंगविलेल्या स्वप्नांवर जहरी नागाच्या फुंकरणे बेचिराख करून तेच डौलदार पिक कुस्तिक पने

त्याच्याकडे पाहून हसत होते. उभ्या पिकाच्या भरवश्यावर उभ केलेलं कर्जाच डोंगर निसर्ग रुसला (कोपला) तर घरा पर्यंत पण येत नाही अश्या वेळी डोळा ठेवून बसलेल्या सावकारांना शेती विकण्याशिवाय पर्याय उरत नाही, जर पिक हाती आलेच तर सावकाराचे वाढते व्याज व पैश्यासाठी दबाव पिकाला मिळेल त्या भावाने विकून सावकारी पाश मोकळा झाल्यावर हाती धुपाटणे आल्यावर परत स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसतात तर पन्नास हजार सारख्या शुल्लक कर्जासाठी आत्महत्या चा मार्ग अवलंबतात.

जुगार हा महाभयंकर मृगजळ सारखाच कधी न संपणारा,याच जुगारमुळे पांडवांना आपले राज्य गमावून वनवास भोगावे लागले नागपंचमीचा जुगार हा पण शेतकऱ्यांना लुटण्यासाठी टाकलेला फासा असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे..म्हणतात ना दिवाळीच्या दिव्याने शेतकऱ्यांचे डोळे उघडतात शेतकर्यांनी नागपंचमी सारख्या पवित्र सणाला जुगार सारखी प्रथा मोडून स्वतःचे डोळे उघडणे आता काळाची गरज आहे.

 

मुख्तार शेख

७०५७९११३११

English Summary: Gambling game of Nagpanchami, like a farmer milking a moneylender! Published on: 02 August 2022, 12:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters