
माहिती करून घ्या, पूर्व मान्सून म्हणजे काय ?
या कालावधीत पश्चिम आणि मध्य भारतातील मोठ्या भागात एकूण वार्षिक पावसाच्या ९०% पाऊस पडतो. तर दक्षिण आणि उत्तर-पश्चिम भागात ५० ते ७५% पडतो. १ जून रोजी मान्सून केरळ मध्ये पोहोचतो. मात्र, देशाच्या काही भागात मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) पावसाला सुरुवात होते.मान्सूनपूर्व पाऊस का पडतो ?मान्सूनपूर्व सरींना 'आंब्याच्या सरी' असेही म्हणतात. व्हर्नल इक्विनॉक्स नंतर, सूर्य कर्क उष्ण कटिबंधाच्या दिशेने उत्तरेकडे सरकत असताना, संपूर्ण भारतात तापमान वाढते ज्यामुळे मान्सूनपूर्व हंगामाची सुरुवात होते. प्री-मॉन्सून मार्च ते मे पर्यंत असतो. या काळात पडणाऱ्या पावसाला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात. मान्सूनपूर्व हंगाम म्हणजे उष्णता आणि आर्द्रता.
उत्तर भारतात जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडतो. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होतो. त्याचवेळी मान्सून ईशान्य भारताच्या काही भागात पोहोचतो. पूर्व मान्सूनला पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी, कर्नाटकमध्ये मँगो शावर आणि केरळमध्ये ब्लॉसम शॉवर म्हणूनही ओळखले जाते. हा पाऊस आंबे लवकर पिकवण्यास मदत करतो.मान्सूनचा पाऊस म्हणजे काय ?मान्सून हा एखाद्या क्षेत्राच्या प्रचलित किंवा जोरदार वाऱ्यांच्या दिशेने होणारा हंगामी बदल आहे. मान्सूनचा संबंध अनेकदा हिंदी महासागराशी असतो. मान्सून नेहमीच थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशाकडे जातो. भारतातील पावसाळा हा अनेक मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियांनी बनलेला असतो. मे-जून महिन्यांत, भारतीय द्वीपकल्प उन्हाळ्याच्या हंगामात उष्ण होतो.
मान्सून साधारणपणे जूनमध्ये दाखल होतो. भारतीय मान्सून जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. या कालावधीत पश्चिम आणि मध्य भारतातील मोठ्या भागात एकूण वार्षिक पावसाच्या ९०% पाऊस पडतो. तर दक्षिण आणि उत्तर-पश्चिम भागात ५० ते ७५% पडतो. १ जून रोजी मान्सून केरळ मध्ये पोहोचतो. मात्र, देशाच्या काही भागात मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) पावसाला सुरुवात होते.मान्सूनपूर्व पाऊस का पडतो ?मान्सूनपूर्व सरींना 'आंब्याच्या सरी' असेही म्हणतात. व्हर्नल इक्विनॉक्स नंतर, सूर्य कर्क उष्ण कटिबंधाच्या दिशेने उत्तरेकडे सरकत असताना, संपूर्ण भारतात तापमान वाढते ज्यामुळे मान्सूनपूर्व हंगामाची सुरुवात होते. प्री-मॉन्सून मार्च ते मे पर्यंत असतो.
हा पाऊस आंबे लवकर पिकवण्यास मदत करतो.मान्सूनचा पाऊस म्हणजे काय ?मान्सून हा एखाद्या क्षेत्राच्या प्रचलित किंवा जोरदार वाऱ्यांच्या दिशेने होणारा हंगामी बदल आहे. मान्सूनचा संबंध अनेकदा हिंदी महासागराशी असतो. मान्सून नेहमीच थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशाकडे जातो. भारतातील पावसाळा हा अनेक मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियांनी बनलेला असतो. मे-जून महिन्यांत, भारतीय द्वीपकल्प उन्हाळ्याच्या हंगामात उष्ण होतो. तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आसपासचे तापमान तुलनेने कमी असते. तापमानाच्या या फरकामुळे समुद्रातील पाण्याचे ढग मोठ्या प्रमाणात उत्तर भारताकडे सरकतात आणि तिथे जाताना संपूर्ण भारतात पाऊस पडतो, याला मान्सून पाऊस म्हणतात._
संदर्भ : लेटेस्ट ली
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
Share your comments