
Mahindra Bolero lonch
सध्या अनेक गाड्या बाजारात येत आहेत, वाहन क्षेत्रातील काही नामांकित कंपन्यांची नावे घ्यायची असतील तर महिंद्र कंपनीचा उल्लेख करावा लागेल. सध्या जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि सर्वोत्तम कारच्या शोधात असाल, तर आज आम्ही तुम्हाला महिंद्रा बोलेरोबद्दल माहिती देणार आहोत. महिंद्राची कार आजच नाही तर अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात आहे.
तसेच महिंद्राच्या बोलेरोने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. लोकांची पहिली पसंती महिंद्रा बोलेरो, गावागावात बोलेरोला सर्वाधिक पसंती दिली जाते कारण तिथले रस्तेही कच्चे आहेत, तरीही ती चांगली धावते. कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महिंद्राने नुकतेच बोलेरोचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. कंपनी लवकरच कारचा संपूर्ण लुक बदलून नवीन कार लॉन्च करणार आहे.
या कारची खास गोष्ट म्हणजे कितीही खड्डे असले तरी ती कोणत्याही खड्डेमय रस्त्यावर सहज धावू शकते. महिंद्राने नवीन शैलीतील बोलेरो ७ सीटर लाँच केली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नवीन मॉडेलची कार सर्व प्रकारच्या रस्त्यांवर धावू शकते. त्या बाबतीत, वाहनात पूर्वी फक्त ड्राईव्ह साइड बॅग होती. परंतु सरकारने ड्युअल एअरबॅग्जचा हा नवीन नियम लागू केल्यामुळे, महिंद्राने एसयूव्ही बोलेरो अद्ययावत करून ती अधिक सुरक्षित केली आहे.
तसेच, त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, B4 ची किंमत 9 लाख रुपये आहे आणि B6 व्हेरिएंटची किंमत 9.8 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेल B6 Opt ची किंमत 10 लाख रुपये आहे. त्याच्या आतील रचनांसोबतच बाह्य डिझाइनमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे हा एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे.
महत्वाच्या बातम्या;
पाकिस्तानातील साखर आयात थांबवली तर तुमचे उद्योजक मित्र आत्महत्या करतील, राजू शेट्टींचा गडकरींना टोला
शेतीमध्ये आता 'हाच' एकमेव पर्याय, पंजाबराव डख यांनी सांगितले गुपित...
आता कोकणात शेतकऱ्यांसाठी पर्वणी, पहिल्यांदाच भरणार भव्य कृषी प्रदर्शन, 'असे' असणार स्वरूप
Share your comments