उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करीत आहात का? कर्ज घेताना नेमके किती कर्ज घ्यावे, त्याची कमाल आणि किमान मर्यादा किती असावी, असे एक ना अनेक विचार मनात घोळत असतात. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची गरज असेल, तर काहीच बिघडत नाही. कारण, वित्तसंस्थेकडून शिक्षणासाठी आवश्यक तेवढी रक्कम कर्जाऊ दिली जाते. या कर्जामध्ये ट्यूशन फी आणि राहण्या-खाण्याचाही खर्च भरून काढले जातात. मात्र, वित्तसंस्थेकडून शिक्षणासाठी कर्जरूपाने नेमके किती कर्ज देण्यात येते, हे सर्वस्वी संबंधित वित्तसंस्थेवर अवलंबून असते.
तुम्हाला परदेशात शिक्षण (education) घ्यायचे असले तरी कोणत्याही बँकेच्या अटी व शर्तींचे पालन करून तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. किंवा देशातील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर सहज कर्ज मिळू शकते. कर्ज (loan) घेण्यासाठी प्रोसेस काय आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
भारतीय शैक्षणिक कर्जाचे हे आहेत 4 प्रकार –
1) करिअर एज्युकेशन लोन – जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल, तेव्हा तो करिअर एज्युकेशन लोन घेऊ शकतो.
2) प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन – प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यास सुरू ठेवण्यासाठी घेतले जाऊ शकते.
3) पालक कर्ज – जेव्हा पालक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात, तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात.
4) अंडरग्रेजुएट लोन – शालेय शिक्षण (education) पूर्ण केल्यानंतर, देशात आणि परदेशात पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.
शैक्षणिक कर्ज असे घ्या
1) सर्व प्रथम बँक किंवा संस्था निवडा.
2) नंतर विद्यार्थी कर्जाची सर्व माहिती मिळवा.
3) बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घ्या.
4) बँकेने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा.
5) बँक आणि तुमची खात्री झाल्यावर कर्जासाठी अर्ज करा.
शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –
वयाचा पुराव
पासपोर्ट साइज फोटो
मार्कशीट
बँक पासबुक
आईडी प्रूफ
एड्रेस प्रूफ
कोर्स डिटेल्स
विद्यार्थी आणि पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड
पालकांचा उत्पन्नाचा दाखला
Share your comments