1. इतर बातम्या

Epfo Big Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आता कर्मचाऱ्यांना देणार आरोग्य सेवेची भेट

कामगारांच्या हितासाठी नेहमी तत्पर असणारी इपीएफओ भारतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवते. यामध्ये पेन्शनचे सुविधा तर मिळतेच परंतु आता कर्मचारी निर्वाह निधी अपंगत्वाचा लाभ तसेच आरोग्यसेवा व अशाच इतर प्रकारच्या सुविधा देण्याच्या एका योजनेवर काम करत असून अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे की कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी वेतन मर्यादा आणि कर्मचारी संख्या मर्यादा नियम काढून टाकण्याचे काम करत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
epfo update

नक्की वाचा:EPFO: नोकरदारांना नवरात्रीमध्ये मिळणार मोठी बातमी! PF खात्यात जमा होणार इतके पैसे

यासाठी आता पेन्शन पासून मातृत्व, अपंगत्व आणि आरोग्यसेवा व इतर सेवांचा विस्तार करण्याचा संघटनेचे आता योजना असून त्यावर आता वेगाने काम सुरू आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्याच्या सेवेच्या मुदतवाढीचा प्रस्ताव आता

प्राथमिक टप्प्यात असून त्यावर चर्चा सुरू असल्याचे देखील संघटनेचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मूलभूत सामाजिक सुरक्षा हमीचा राष्ट्रीय स्तरावर  गरिबी आणि सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी किंवा कमी करणे तसेच आवश्यक आरोग्य सेवा आणि उत्पन्न सुरक्षा चा प्रवेश यामध्ये समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:बातमी कामाची! आधार क्रमांक नाही, तरीही तुम्ही सहजपणे -आधार डाउनलोड करू शकता! प्रक्रिया माहिती करून घ्या

सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफ आणि विविध तरतुदी कायदा 1952 च्या अंतर्गत नियम आणि दायित्वे बदल यावर सध्या काम करत असून त्यानंतर 15000 पेक्षा कमी पगार असलेले व 20 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांनाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शन योजना आणि इतर सेवांशी जोडले जाण्याची शक्यता आहे.

यासाठी संघटनेने संपूर्ण देशातील 450 दशलक्ष कर्मचाऱ्यांना या सेवा पुरवण्याचे  लक्ष ठेवले असून असंघटित क्षेत्रातील 90% कामगारांना या सेवांचा लाभ मिळावा हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.

नक्की वाचा:कामाची बातमी: आता घरबसल्या मिळणार PF बॅलन्सची माहिती; कशी ते जाणून घ्या

English Summary: empolyees provident fund orgnization can give health service to employee Published on: 22 September 2022, 10:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters